नाश्त्यात नेहमीच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काकडी(dosa) ओल्या खोबऱ्याचा चविष्ट डोसा बनवू शकता. हा डोसा हिरव्या चटणीसोबत सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.
सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे पोटही(dosa) भरलेले राहते आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जातो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही काकडी आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट डोसा बनवू शकता. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून तुम्ही नाश्त्यातील पदार्थ बनवू शकता. डोसा तांदळाचे पीठ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवला जातो. वाढलेले वजन कमी करताना तुम्ही आहारात काकडीपासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू शकता. कारण काकडी शरीर हायड्रेट राहते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी काकडीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया काकडी ओल्या खोबऱ्याचे डोसे बनवण्याची सोपी रेसिपी.
जेवणाची मजा होईल द्विगुणित; एकदा घरी बनवून तर (dosa)पहा लज्जतदार भरलेली शिमला मिरची
साहित्य:
तांदूळ
काकडी
उडीद डाळ
मेथी दाणे
खोबऱ्याचा किस
भात
पोहे
हिरवी मिरची
मीठ
कृती:
काकडी ओल्या खोबऱ्याचे डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ करून पाण्यात भिजत ठेवा.
त्याच पाण्यात मेथी दाणे टाकून भिजत ठेवा. यामुळे डोसे चवीला सुंदर लागतील.
मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ आणि डाळ बारीक वाटून घ्या. डाळीसोबतच २ मिरच्या वाटून घ्या.
स्वच्छ धुवून घेतलेल्या काकडीचे बारीक बारीक तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकून वाटून घ्या.
मोठ्या वाटीमध्ये बारीक करून घेतलेली काकडी, खोबऱ्याचे किस आणि तांदळाचे मिश्रण टाकून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात आणि भिजवलेले पोहे घालून त्यात थोडस पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा.
तयार केलेली पेस्ट डोश्याच्या मिश्रणात टाकून मिक्स करा.
पॅन गरम करून त्यावर तेल टाकून पसरवून घ्या. वरून तयार केलेले डोश्याचे मिश्रण गोलाकार पसरवा आणि दोन्ही बाजूने भाजून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला काकडी ओल्या खोबऱ्याचा चविष्ट डोसा.
हेही वाचा :