सांगलीत अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं, गोपीचंद पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा, शिंदे गटाची मागणी

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणी (demands)आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. या दोन्ही गटांकडून आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे. भाजप तालुकाध्यक्षांकडून आमदार सुहास बाबर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला. तसेच बाबर यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपकडून देण्यात आले आहे. तर शिंदे गटाकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता केली जात आहे. याबाबत आटपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

कुपवाडमधील अमोल रावसाहेब रायते वय ३२ या युवकाचा रात्री धारदार हत्याराने निर्घृण खून करण्यात आलाय. कुपवाडमधील रामकृष्ण नगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही खुनाची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून आणि धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.(demands) घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, खून करून मारेकरी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील खुनाच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटामध्ये भाजपकडून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती. यावेळी जयकुमार गोरे यांनी गोपीचंद पडळकर यांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, गोपीचंद पडळकर यांची मुद्द्याने आणि गुद्याने देखील लढायची तयारी असते. माझ्या खात्यातला सगळा कोटा गोपीचंद पडळकरसाठी द्यायची माझी तयारी आहे. पृथ्वीच्या अंतापर्यत आमच्या माण-खटाव भागात पाणी येणार नाही असे बारामतीची मंडळी सांगत होती. त्यामुळे आमच्या भागातील माणसे देखील पाणी मागत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमच्या भागात पाणी आले. आज आमच्या तालुक्यात पाच कारखाने उभे आहेत. त्यामुळे ज्या भागात पृथ्वीच्या अंतापर्यत पाणी न येणाऱ्या भागात या निवडणुकीत मी उभे राहिलो आणि दुष्काळमुक्तीसाठी मी उभा राहिलो आहे, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले.

गोपीचंद पडळकर आणि मी जिवाभावाचे मित्र आहोत आणि माझ्या खात्यामध्ये गोपीचंद पडळकरसाठी बजेटचा विषय नाही. (demands)देवेंद्र फडणवीस माझ्या खात्याला जो बजेटचा कोटा देतील, तो सगळा कोटा गोपीचंद पडळकर साठी द्यायची माझी तयारी आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेत. गोपीचंद पडळकर हा सर्वसामान्य व्यक्तीसाठी काम करणारा, व्यथा मांडणारा आणि तो प्रश्न तडीस नेणारा हा बहुजनांचा नेता आहे. एखाद्या प्रश्नासाठी गोपीचंद पडळकर यांच्यावर मुद्द्याने आणि वेळ आली तर गुद्याने देखील लढायची तयारी असते. त्यामुळे असे नेतृत्व आपण वाढवले पाहिजे असे, मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

हेही वाचा :