नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून आज जाहीर करण्यात आला आहे.(declared) या वर्षी २०.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, आणि आज त्यांना त्यांचा बहुप्रतीक्षित निकाल मिळाला आहे. परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in, nta.ac.in आणि exam.nta.ac.in या अधिकृत वेबसाइट्सवर उपलब्ध आहे.विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअरकार्ड लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून डाउनलोड करता येईल. याशिवाय निकाल विद्यार्थ्यांच्या ई-मेलवरही पाठवण्यात आला आहे. उमंग अॅप आणि डिजिलॉकरवरूनही निकाल पाहता येईल.
या वर्षी राजस्थानच्या महेश कुमारने देशात पहिला क्रमांक पटकावला असून, इंदूरच्या उत्कर्ष अवधिया याने दुसरा आणि महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी याने तिसरा क्रमांक मिळवला आहे.(declared) दिल्लीच्या मृणाल किशोर झा आणि अविका अग्रवाल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या चार क्रमांकांवर मुलांनी कब्जा केला असून पाचव्या क्रमांकावर अविका अग्रवाल ही एकमेव मुलगी आहे.
नीट यूजी परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS तसेच विविध पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. तसेच, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस च्या बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठीही ही परीक्षा महत्त्वाची आहे.
एनटीए पोर्टल: nta.ac.in डिजिलॉकर अॅप आणि उमंग अॅप द्वारे सुद्धा स्कोअरकार्ड पाहता येईल.(declared)नीट यूजी 2025 परीक्षा ४ मे २०२५ रोजी देशभरात ५४५३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यंदाच्या परीक्षेत २२.७६ लाख नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ९१.५% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ही उपस्थिती २०२१ नंतरची सर्वात कमी आहे. यंदा पेपरची पातळी AIIMS प्रवेश परीक्षेसारखी कठीण असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :