पती आणि पत्नीच्या सहजीवनाच्य गोष्टी आपण ऐकत किंवा वाचत असतो. संकटात एकमेकांना(stories) दिलेली खंबीर साथ, बिकट परिस्थितीतही न सोडलेला हात, अशा अनेक कहाण्या आपण सिनेपात पाहतो. अनेकद प्रत्यक्षातही अशा कहाण्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मृत्यूनंतरही एखाद्यानं आपल्या साथीदाराची साथ सोडली नसेल तर? रशियामधून एका घटनेनं याचा प्रत्यय आला आहे.
जगात अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात जिथे लोक त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूमुळे मानसिक संतुलन(stories) गमावतात आणि सत्य स्वीकारू शकत , मात्र अलिकडेच रशियामधून असाच एक प्रकार समोर आला. जिथे एक महिला सुमारे ४ वर्षांपासून तिच्या पतीच्या मृतदेहासोबत राहत होती. त्या महिलेने तिच्या मुलांनाही तिथे ठेवले होते. असे सांगितले जात आहे की ती तिच्या पतीच्या ममी केलेल्या मृतदेहासोबत त्याच बेडवर झोपायची.
तिने तिच्या मुलांना धमकी दिली होती की जर त्यांनी कोणासमोर तोंड उघडले आणि हे सर्व सांगितले तर ती त्यांना अनाथाश्रमात सोडणार. मिळालेल्या माहितीनुसार ४९ वर्षीय व्लादिमीरचा चार वर्षांपूर्वी त्याच्या वेगळ्या घरात रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘स्वेतलानाने तिच्या मृत पतीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि तो तिच्या खोलीत आणला आणि बेडवर ठेवला.
समाजसेवक घरातल्या लोकांची चौकशी करण्यासाठी आले तेव्हा ही बाब उघडकीस आली. व्लादिमीरच्या(stories) मृतदेहाव्यतिरिक्त, त्यांना घरात स्वेतलानाच्या १७ आणि ८ वर्षांच्या दोन मुली आणि ११ वर्षांचे जुळे मुलगे दिसले. पहिल्या चार वर्षांत जेव्हा जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना मृतदेह दिसला नाही.
‘तो एक दिवस जागे होईल अशी आशा आहे’
इझ्वेस्टिया वृत्तपत्राला एका सूत्राने सांगितले की स्वेतलानाने कुटुंबाच्या सहा बेडरूमच्या घरात ममी केलेल्या अवशेषांसह तंत्र मंत्र केला होता. ती आणि तिचा पती यापूर्वीही अशा गोष्टींमध्ये सहभागी असायचे. असे सांगितले जात आहे की महिलेला तिचा पती गमावायचा नव्हता आणि तिला आशा होती की तो एक दिवस जिवंत होईल. त्याच वेळी, स्वेतलानाने या सूत्राला सांगितले की, ‘मला त्याच्या जवळ राहायचा होतं, जेणेकरून आपण एकमेकांना पाहू शकू.’
घरात सापडलेल्या भयानक गोष्टी
फोंटांका वृत्तसंस्थेनुसार, मृतदेहाच्या पायाजवळ एक इजिप्शियन क्रॉस सापडला. त्या महिलेचे घर टॅरो कार्ड, ताबीज, कवट्या आणि मृतांचा प्राचीन इजिप्शियन देव अनुबिसच्या अनेक चित्रांसारख्या अनेक गूढ वस्तूंनी भरलेले होते. अहवालात म्हटले आहे की, ‘पुरुषाच्या मृत्यूपूर्वी, पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर ती महिला तिच्या पतीवर ओरडून त्याला शिव्या देऊ लागली आणि तो माणूस अचानक बेशुद्ध पडला आणि मरण पावला.’ यानंतर स्वेतलानाने तिच्या पतीच्या मृतदेहावर कोणतेही अंत्यसंस्कार न करता मृतदेह घरातच ठेवून दिला.
हेही वाचा :