समुद्रकिनारी सेल्फी काढणं पडलं महागात; आयुष्यभर लक्षात राहील ही घोडचूक… Video Viral

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक अनेक वेगवेगळे व्हिडिओज(Video ), आपले अनुभव शेअर करतात. इथे अनेक हास्यास्पद, धक्कादायक तर काही थक्क करणारे व्हिडिओज शेअर केले जातात. अशातच एक ट्रॅव्हल व्लाॅगरने आपल्या बाली ट्रिपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात ती जवळजवळ मृत्यूच्या लक्ष्मणरेषेवरून परतल्याने दृश्य दिसून आले. बालीच्या समुद्रकिनारी सेल्फी काढत असताना तरुणीसोबत एक भयांकर प्रकार घडतो आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये(Video ) तुम्ही पाहू शकता यात एक तरुणी समुद्रकिनाऱ्यावर उभी राहून सेल्फी काढत असल्याचे दिसते. पण याचवेळी अचानक समुद्राचे वातावरण खवळते आणि एक जोरदार लाट तरुणीच्या दिशेने येत तिच्या अंगावर आदळते. समुद्रकिनारी अशा अनेक घटना नेहमीच घडत असतात ज्यामुळे अशा ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या जीवाची विशेष काळजी घ्यायला हवी. अशा अनेक घटनांमध्ये लोकांनी आपले प्राण गमावले आहे. व्हिडिओतील तरुणी मात्र यातून सुखरूप बाहेर पडते पण बाली प्रवासातील हा भयानक अनुभव तिला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे.

ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर केटी जॉन्सनला हिच्यासोबत ही घटना घडून आली. या ठिकाणी याआधीही अनेक लोकांनी आपले प्राण गमावल्याची माहिती तिने शेअर केली मात्र इथे कोणताच साइन बोर्ड नसल्याने अनावधानाने तीही या अपघाताची शिकार बनली पण सुदैवाने यातून ती सुखरूप बाहेत पडली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये केटीने आपला संपूर्ण अनुभव शेअर केला आहे.

हा व्हायरल व्हिडिओ @iamkatyjohnson नावाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओला भरभरून व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आता तू सुरक्षित आहेस हे पाहून खूप समाधान वाटले. तुला जीवन आणि प्रवास आवडतो ही गोष्ट मला खूप अडवते कारण मलाही ते आवडते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “समुद्राकडे कधीही पाठ फिरवू नये, तू ठीक आहेस याचा खूप आनंद आहे”.

हेही वाचा :