५० रुपये वाचविण्यासाठी उपाशी राहायचा गायक, आज आहे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव

‘तेरी दिवानी’ गाण्याचा उल्लेख केला की, डोळ्यासमोर कैलाश खेर यांचा चेहरा येतो. कैलाश खेर हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. (free music)आपल्या दमदार आवाजाने चाहत्यांच्या भुरळ घालणाऱ्या गायकाचा आज ५२ वा वाढदिवस आहे.

‘तेरी दिवानी’ गाण्याचा उल्लेख जरी केला तरी डोळ्यासमोर येतो कैलाश खेर यांचा चेहरा. कैलाश खेर हे भारतीय पॉप-रॉक आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध असे नाव आहे. आतापर्यत हिंदी, पंजाबी, तामिळ, तेलुगु, कन्नड, उर्दु आणि राजस्थानीसह अशा अनेक भाषांमध्ये कैलाश खैर यांनी गाणे गायले आहेत.(free music) आपल्या दमदार आवाजाने चाहत्यांच्या भुरळ घालणाऱ्या गायकाचा आज (७ जुलै) ५२ वा वाढदिवस आहे.

मुळचे दिल्लीचे असणारे कैलाश खेर मुंबईत आले तेव्हा राहावे कुठे, काय खावे यापासून त्यांची अडचण होती. पण या सर्वांवर मात करत त्यांनी आज संपूर्ण संगीतक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी फार काटकसर करावी लागली. कैलाश हे भारतीय लोकसंगीत(free music) आणि सुफी संगीतासाठी ओळखले जातात. त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २०१७ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजच्या काळात कैलाश खेर यांच्या आवाजाची ख्याती फक्त भारतातच नाही तर, जगभरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. कैलाश खेर यांचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत हे यश मिळवलं आहे.

कैलाश खेर यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती, त्यामुळे त्यांनी फार लहान वयातच घर सोडून संगीतात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. कैलाश खेर यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने घर सोडले. कैलाश यांनी घर सोडल्यानंतर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. संगीतात करिअर करण्यापूर्वी कैलाश यांनी त्यांच्या एका मित्रासोबत हस्तकलेचा व्यवसाय केला होता, पण त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. दिल्लीत जन्मलेले कैलाश हे एका काश्मिरी कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचे वडील मेहरसिंग खेर हे देखील भारतीय लोकसंगीत गायक होते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे कैलाश यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासूनच संगीतात आपली छाप दाखवायला सुरुवात केली.

शिक्षणानंतर कैलाश खेर यांनी घर सोडले आणि विचित्र नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह केला. जेव्हा कैलाश यांना कोणतेही काम मिळत नव्हते, तेव्हा त्यांनी काही मुलांना संगीताचे धडे दिले. त्या काळात कैलाश ५० रुपये फी घ्यायचे. नंतर कैलाश उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गेले आणि गंगेच्या काठावर आपल्या आवाजाची जादू पसरवू लागले. ऋषिकेशमध्ये जेव्हा ते गाणी म्हणायचे आणि लोक त्यांच्या आवाजावर नाचायचे, तेव्हा त्यांना दैवी अनुभूती मिळायची. ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर असलेल्या आश्रमांबाहेर आरतीच्या वेळी कैलाश खेर रोज त्यांच्या आवाजात एक गाणे म्हणायचे, ते ऐकून तिथे उपस्थित ऋषी-मुनीही नाचू लागायचे. एके दिवशी गायकाचा आवाज ऐकून एक साधू म्हणाले, तुझ्या आवाजात जादू आहे, इतकी काळजी करू नकोस.

भोलेनाथ सर्वकाही ठीक करेल. महंतांचे म्हणणे ऐकून त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशहून मुंबईला आले. इथून त्यांच्या करिअरमधला संघर्ष सुरु झाला. कैलाश यांना नंतर जिंगल्स गाण्याची संधी मिळाली. कैलाशने आतापर्यंत 2000 हून अधिक जिंगल्स गायल्या आहेत आणि ते भारत सरकारच्या वतीने जिंगल्सला आवाज देतात. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या ‘अंदाज’ मध्ये एक सूफी गाण्याची संधी मिळाली ज्याचे शीर्षक ‘रब्बा इश्क ना होवे’ आहे.

हेही वाचा :