शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना होणे, संधिवात किंवा आरोग्यासंबंधित इतरही(health) समस्या उद्भवू लागतात. यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरात ही गंभीर लक्षणे दिसून येतात.
हवामानात होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, वारंवार बिघडलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात बऱ्याचदा अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे हेच छोटे आजार मोठे होतात. शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवाताची समस्या उद्भवू लागते. यूरिक अॅसिड वाढल्यानंतर मुतखड्याचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. यूरिक अॅसिड रक्तामध्ये जमा होऊ लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. चुकीच्या जीवनशैलीचा (health) थेट परिणाम आरोग्यावर होतो. यूरिक अॅसिड शरीरात निर्माण होणारा टाकाऊ पदार्थ आहे. यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये खड्डे साचण्याची शक्यता असते.
शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर हळूहळू रक्तात यूरिक अॅसिड वाढून खड्डे तयार होऊ लागतात. मेडिकल भाषेत याला हायपरयुरिसेमिया असे म्हणतात. रक्तात मोठ्या प्रमाणावर यूरिक अॅसिड तयार झाल्यानंतर हळूहळू हाताच्या बोटांमध्ये किंवा पायांच्या बोटांमध्ये क्रिस्टल तयार होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात यूरिक अॅसिड वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
यूरिक अॅसिड वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारे बदल:
गाउट किंवा असह्य सांधेदुखी:
शरीरात यूरिक अॅसिड वाढल्यानंतर ते सांध्यांमध्ये साचून राहते. ज्यामुळे हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. (health) जेव्हा यूरिक अॅसिडचे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे संधिवात किंवा गाऊट होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा या वेदना अतिशय तीव्र होऊन जातात. ज्यामुळे चालताना किंवा कोणतीही हालचाल करताना वेदना होऊ लागतात. पायाची बोटे, घोटे, गुडघे आणि बोटांमध्ये युरिक ऍसिड साचून राहते.
मूतखडा:
हल्ली अनेकांना मुतखड्याची समस्या उद्भवू लागली आहे. लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे न करता तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. क्रिस्टलची समस्या केवळ सांध्यांमध्येच नाहीतर मूत्रपिंडातही साचून राहण्यास सुरुवात होते.यामुळे मूत्रपिंडांवरभार येतो, ज्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.
हृदयरोगाचा धोका:
शरीरातील अतिशय नाजूक अवयव म्हणजे हृदय. हृदयाच्या कार्यात कोणताही अडथळा निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. यूरिक ऍसिडची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील स्तराचे नुकसान होते. तसेच रक्तवाहिन्यांमधील लवचिकता कमी होऊन जाते.
युरिक ऍसिड म्हणजे काय?
युरिक ऍसिड हे एक नैसर्गिक रसायन आहे, जे शरीर प्युरिन नावाचे पदार्थ पचन करते तेव्हा तयार होते.
युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास काय होते?
युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास गाउट आणि किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
सांध्यांमध्ये वेदना आणि सूज, सांध्यांभोवती लालसरपणा किंवा त्वचेला चमक येणे, किडनी स्टोनची लक्षणे. रक्ताची आणि लघवीची तपासणी करून युरिक ऍसिडची पातळी तपासता येते.
हेही वाचा :
- भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज! मालिकेत टीम इंडीयाची 1-0 अशी आघाडी
- 20 जुलै रोजी रविवारी तिन्ही मार्गांचा मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी ‘हे’ वाचा
- सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या भावात घसरण! जाणून घ्या आजच्या किंमती
- वैष्णवी हगवणे न्यायप्रकरणी मोठा ट्विस्ट! IPS सुपेकर सहआरोपी करण्याच्या शिफारशीने खळबळ