शाळेपासूनच प्रेम होतं लग्नाच्या 8 वर्षानंतर त्याने बायकोसमोर असा प्रस्ताव ठेवला की तिने

लग्नाच पवित्र नातं परस्पराच्या विश्वासावर टिकून (proposed)असतं. पण लग्नानंतर तुमच्या पार्ट्नरनेच तुमची फसवणूक केली तर?. हरियाणाच्या पानीपतमध्ये हे प्रकरण समोर आलय. एका युवकाने शाळेपासूनच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. लग्न करुन घरी आल्यानंतर मुलीला समजलं की, नवऱ्याच स्पा सेंटर आहे. तिथे देह व्यापार चालतो. पण कुटुंबासाठी म्हणून ती गप्प राहिली. लग्नानंतर काही वर्षांनी नवरा त्याच्या मूळ स्वभावावर आला. त्याने पत्नीलाही सोडलं नाही. लग्नानंतर आठ वर्षांनी तो पत्नीला बोलला की, तुलाही आता स्पा सेंटरमध्ये तेच करावं लागेल, जे इतर मुली करतात.

पत्नीने त्याला सांगितलं, हे सर्व मी करणार नाही. या बद्दल पोलिसांना सांगेन. त्यानंतर पत्नीने स्पा सेंटरमध्ये छापा मारायला लावला. पत्नीच्या या कृतीने नवरा हडबडला. त्याने पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.पानीपतच्या नलवा कॉलनीतील हे प्रकरण आहे. पतीने पत्नीला जबरदस्तीने विषारी गोळ्या (proposed)खायला घालून हत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकच नाही, सासूने सुद्धा या कामात मुलाची म्हणजे नवऱ्याची साथ दिली. सासूने सूनेच तोंड पकडलं व नवऱ्याने जबरदस्तीने 6 गोळ्या तिच्या तोंडात भरल्या.

पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध
पती मुजफ्फरनगर येथे स्पा सेंटरच्या आडून देह व्यापाराचा धंदा करतो, असा आरोप पत्नीने केला. तिच्यावर सुद्धा याच व्यवसायात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत होता. पण पत्नीने नकार दिला आणि स्पा सेंटरवर रेड मारायला लावली. यावर नाराज झालेल्या पती आणि सासूने सूनेची हत्या करण्याचा (proposed)प्रयत्न केला. पानीपत येथील रुग्णालयात दाखल असलेल्या पत्नीने पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला.

पत्नीच्या भावाने काय सांगितलं?
पत्नीच्या भावाने सांगितलं की, या घटनेनंतर भावोजी मला भेटण्यासाठी इथे आले होते. प्रकरण इथेच मिटवा नाहीतर मला तुरुंगात जावं लागेल अशी धमकी त्यांनी दिली. पीडितेच्या भावाने सांगितलं की, तक्रारीनंतर FIR नोंदवण्यात आला आहे. पण आरोपीला अजून अटक झालेली नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही अंबाला येथे जाऊन अनिल विज यांची सुद्धा भेट घेऊ, असं पत्नीच्या भावाने सांगितलं.

हेही वाचा :

दारूसाठी पैसे दिले नाही, नवरा संतापला; शेतात अर्धनग्न करून विटेने मारहाण

मोहम्मद शमी अडचणीत! हसीन जहाँने केले गंभीर आरोप

मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट गुन्हा दाखल होणार