केळीच्या पानात बनवून पहा मसालेदार पापलेट फ्राय; पारंपरिक आहे रेसिपी

हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा २५ जुलैपासून श्रावणाला सुरु होणार आहे, म्हणजेच २४ जुलै हा नॉनव्हेज खाण्यासाठीचा शेवटचा दिवस असणार आहे.(banana ) अशात सर्व मांसाहारी प्रेमींनी आतापासून मांसाहारावर ताव मारायची सुरुवात केली आहे. आम्ही देखील गटारीसाठी सज्ज झाले असून आज आम्ही तुमच्यासाठी गटारी निमित्त एक खास आणि सर्वांच्या आणणारी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे पापलेट फ्राय! मात्र हा पापलेट आपण साधा नाही तर याची चव वाढवण्यासाठी याला एका हटक्या पद्धतीमध्ये तयार करणार आहोत.केळीच्या पानात बनवलेला पापलेट फ्राय ही एक पारंपरिक आणि खास चविष्ट कोस्टल रेसिपी आहे. माशावर खास मसाला लावून, त्याला केळीच्या पानात गुंडाळून, मंद आचेवर शिजवले जाते. त्यामुळे माशाची चव, मसाल्यांचा सुवास आणि केळीच्या पानाचा खास नैसर्गिक फ्लेवर एकत्र येतो. ही रेसिपी कोकण आणि केरळमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
माशासाठी:
पापलेट मासा – २ मध्यम आकाराचे, (banana ) स्वच्छ धुतलेले
केळीची पाने – २ मध्यम तुकडे साफ करून गरम करून मऊ केलेली
मसाल्यासाठी:

आले-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
लाल तिखट – १ टीस्पून
हळद – १/२ टीस्पून
लिंबाचा रस – १ टीस्पून
ओलं खोबरं – २ टेबलस्पून
धने पावडर – १ टीस्पून
जिरं पावडर – १/२ टीस्पून
मीठ – चवीनुसार
हिंग – एक चिमूट
थोडं पाणी – आवश्यकतेनुसार
तेल – २ टेबलस्पून

कृती
पापलेट फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम माशाला मधून चिरा पाडून स्वच्छ धुवून घ्या (banana ) आणि थोडासा लिंबाचा रस, मीठ लावून बाजूला ठेवा.
एका मिक्सरमध्ये ओलं खोबरं, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धने-जिरे पावडर, हिंग, लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून बारीक पेस्ट बनवा.
तयार मसाला माशावर सर्व बाजूंनी आणि चिरांमध्ये भरून लावा. १५-२० मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
प्रत्येक माशाला एका केळीच्या पानात व्यवस्थित गुंडाळा
कढईत किंवा तव्यावर थोडं तेल गरम करा. त्यात केळीच्या पानात गुंडाळलेला पापलेट ठेवा
झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे एका बाजूने शिजवा.
नंतर हे केळीचं पान पलटून दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्या.
शेवटी केळीचं पान उघडून गरम गरम पोम्फ्रेट फ्राय सादर करा. तुम्ही चाहाल तर पानासकटही सर्व्ह करू शकता.
मसाल्यात तुम्ही कोथिंबीर आणि कांदा पेस्टही घालू शकता.

हेही वाचा :