राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे.(offer)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभादरम्यान फडणवीसांनी ही चपखल आणि राजकीयदृष्ट्या खळबळजनक टिपणी केली.फडणवीस म्हणाले, “उद्धवजी 2029 पर्यंत विरोधकांकडे स्कोप नाही. तुम्हाला इकडे यायचं असेल, तर स्कोप आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.” या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गट आणि फडणवीसांमध्ये पुन्हा युती होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट यांना “आमचा मित्रपक्ष” संबोधले. हे वक्तव्य केवळ युक्तिवाद नसून संभाव्य राजकीय जवळीकीचे संकेत देणारे आहे. (offer)विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका विजयी मेळाव्यात एकत्र दिसले होते. त्यावरून मनसे-ठाकरे गट युतीची चर्चा रंगली होती.मात्र आता भाजपकडून उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली गेल्यामुळे “तीन कोनांचा राजकीय तिढा” उभा राहण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंना दूर ठेवून भाजप-ठाकरे गट युती साधणार का, की तिघांचाही मिळून नवीन गठबंधन तयार होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
फडणवीस यांनी केलेली “2029 पर्यंत स्कोप नाही” ही टिप्पणी सत्तेवरील भाजप-शिंदे गटाच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. (offer)अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या निरोपप्रसंगी फडणवीसांनी ही राजकीय हलकीशी टोलेबाजी करत, ठाकरे गटाला ‘सत्तेतील मित्र’ होण्याचं आमंत्रण दिलं.या विधानानंतर ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी शिवसेनेतील काही नेत्यांमध्ये हालचाली वाढल्याचं वृत्त आहे. या ऑफरचा ठाकरे गट स्वीकार करतो की नाकारतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :