खरीप हंगाम आला की वाढती मागणी लक्षात घेता काही कंपन्या व विक्रेत्यांकडून बोगस खत-बियाण्यांची विक्री केली(supply demand) जाते. परंतु, त्याचा आर्थिक फटका शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना बसतो. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे 6 नमुने घेण्यात आले होते. ते नमुने नागपूरयेथील प्रयोगशाळेत पाठवून त्यापैकी 5 नुमने अप्रमाणित आढळून आल्याने वरुण सि प्रा. लि. हैदराबाद कंपनीवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गुणनियंत्रण विभागाने दिली.
निरीक्षक कार्यरत आहे. याशिवाय जिल्हास्तरीय एक व प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे 8 अशा 9 भरारी पथकांची खरीप हंगामात कंपन्या व विक्रेत्यांवर विशेष नजर असते. खरीप हंगामात भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना (supply demand)गणेशा सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, उगवण क्षमता असल्यामुळे सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या. बोगस बियाण्याबाबत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कारवाईचे निर्देश दिले होते.
अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गुणनियंत्रण चाफले यांनी हैद्राराबाद येथील वरुण सि अँण्ड इंडिया प्रा. लि. या कंपनीचे गणेशा सोयाबीनचे वाण्याचे 6 नुमने घेऊन नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविले होते. त्यापैकी सोयाबीनचे 3 नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बोगस कंपनीचे बियाणे खरेदी केले, त्यांना मोठा फटका बसला.
खरेदी करताना सावधानता बाळगावी शेतकऱ्यांनी खत-बियाणे व किटकनाशके खरेदी करीत असताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बियाणे व खताची खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून त्याची रितसर पावती घ्यावी. खरेदी पावती सांभाळून ठेवल्यास बियाणे बोगस निघाले तर संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करून नुकसानभरपाई मिळवता येते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले होते निर्देश
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गणेश सोयाबीनचे वाण पेरणी केले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील(supply demand) सोयाबीन बियाणे न निघाल्याने शेतकऱ्यांना आमदार राजेश बकाने यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत आढावा बैठकीत राजेश बकाने यांनी प्रश्न उपस्थित राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे लक्ष वेधले. यावेळी डॉ. भोयर यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
नागपूरच्या प्रयोगशाळेत होते तपासणी
वरुण सिड्स अँड इंडिया प्रा. लि. हैदराबाद या कंपनीचे गणेश सोयाबीनचे वाणचे 6 नुमने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी 5 नमुने बोगस निघल्याचा तपासात आढळून आले. प्रयोगशाळेत नमुना नापास झाला, तर संबंधित कंपनीविरुद्ध नोटीस पाठवून न्यायालयीन खटला दाखल करण्यात येईल.
हेही वाचा :