७० वर्षीय ज्येष्ठाकडून मुलींचा विनयभंग पैशाचे आमिष दाखवून लज्जास्पद कृत्य

येथील न्यू पाच्छा पेठेतील एका प्राथमिक (complaint)शाळेसमोरून घरी जाणाऱ्या तीन १३ वर्षीय चिमुकलींना पैशाचे आमिष दाखवून यलप्पा कुंचीकोरवे वय ७० याने विनयभंग केला, अशी फिर्याद जेलरोड पोलिसांत दाखल झाली आहे. त्यावरून यलप्पा कुंचीकोरवे याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोलापूर शहरातील महापौर बंगल्याजवळील एका नामांकित शाळेत ‘एलकेजी’च्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीचा ५४ वर्षीय शिपायाने लैंगिक छळ केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेचा सदर बझार पोलिसांमार्फत तपास सुरू असतानाच, आता न्यू पाच्छा पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाने १३ वर्षीय तीन मुलींचा घरी जाताना बोळात विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

७ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित मुलींच्या शाळेपासून काही अंतरावर राहणाऱ्या यलप्पा कुंचीकोरवे याने पैशाचे आमिष दाखवून त्या चिमुकलींच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केले. घाबरलेल्या मुलींनी हा प्रकार शाळेत सांगितला. त्यांच्या पालकांनाही ही बाब समजली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्वरित पोलिस ठाणे गाठले.घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रताप पोमण, पोलिस (complaint)निरीक्षक भाऊराव बिराजदार, सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्स्ना भांबिष्टे, पोलिस उपनिरीक्षक विनय जाधव, मनोज मोरे यांनी पीडित मुलींच्या घरी भेटी देऊन विचारपूस केली.

वय जास्त, हृदयाची बायपास; पोलिसांनी नोटीस बजावून सोडले
संशयित आरोपीची मुले परगावी असतात, घरी पत्नीसोबत तो राहायला आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याचे(complaint) कागदोपत्री वय ७० आहे. त्याच्या हृदयाची बायपास झाली असून, काही दिवसांपूर्वी लकवा मारला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला नोटीस बजावून सोडले असून, चौकशीसाठी गरज वाटेल त्यावेळी त्याला हजर राहावे लागणार आहे.

हेही वाचा :

घटस्फोटानंतर सोहेल खानसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?

ओपन मॅरेज म्हणजे नक्की काय?, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

ग्रामपंचायत ते नगरविकास, सामान्यांसाठी मंत्रिमंडळाची मोठी भेट! ९ निर्णय झाले

खेळाडूची चूक आणि Virat Kohli संतापला, रागात मैदानावर… Video Viral