सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तेलाची फोडणी महागली, एका डब्यामागे ६० रुपयांची वाढ

गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कारण खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.(prices )इराण आणि इस्राईलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका खाद्यतेलाच्या किंमतीवर बसला आहे. १५ लिटर तेलाच्या एका डब्यामागे आता ६० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, पाम तेल, मोहरीचे तेल आणि वनस्पती तूप या सर्वांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १५ लिटरच्या एका तेलाच्या डब्यामागे तुम्हाला ५० ते ६० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती काही दिवसांपूर्वी कमी झाल्या होत्या. पण इराण-इस्राईल युद्धामुळे तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या.

मोहरीचे तेल, पाम तेल आणि सूर्यफूलाच्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे.(prices ) कच्च्या तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्यामुळे सर्वच खाद्यतेलांच्या किंमतीत घसरण झाली होती. पण इराण-इस्राईल युद्धामुळे तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. घाऊक बाजारामध्ये शेंगदाणा तेल वगळता सर्वच खाद्य तेलाच्या किंमतीत १५ किलोच्या डब्यामागे आणि लिटरच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.

फक्त शेंगदाणा, सूर्यफूल, मोहरीचे तेल आणि पाम तेलाच्या दरात वाढ झाली नाही तर खोबरेल तेलाच्या दरात देखील वाढ झाली आहे. (prices )गोटा खोबऱ्याचे भाव वाढल्यामुळे २५ किलो खोबरेल तेलाच्या डब्याच्या किंमती ६ हजार रुपयांवर पोहचल्या आहेत. तेलांच्या दरात वाढ झाल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. तेलाची फोडणी महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

हेही वाचा :