हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची संधी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.(posts ) एचपीसीएलने 2025 साठी फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी 300 हून अधिक तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 1.80 लाख रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2025 आहे.
या भरतीअंतर्गत विविध पदांचा समावेश आहे, त्यामध्ये मुख्यतः ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल, मेकॅनिकल, QC, इंजिनिअर्स सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, चार्टर्ड अकाउंटंट , HR ऑफिसर, लॉ ऑफिसर, CGD प्रोजेक्ट ऑफिसर आदी पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार आहे. इच्छुक उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री, MBA HR, लॉ डिग्री किंवा CA/ICAI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. फ्रेशर्ससाठी डिप्लोमा किंवा डिग्री असावी लागते तर अनुभवी पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
HPCL कडून निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 30,000 ते 1.80 लाख रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. काही निश्चित मुदतीच्या करारावर असलेल्या पदांसाठी 15 लाख रुपये वार्षिक पॅकेजही देण्यात येणार आहे.नियुक्तीच्या प्रक्रियेत काही टप्प्यांचा समावेश आहे. या टप्प्यांना उमेदवारांना पार करावे लागणार आहे. उमेदवारांना याआधी संगणकाधारित परीक्षा किंवा लेखी परीक्षा पात्र करावे लागणार आहेत. उमेदवारांना ग्रुप डिस्कशन करावे लागणार आहे. कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना हजेरी लावावी लागणार आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या टायपिंग स्पीडचे प्रदर्शन करावे लागणार आहे. वैयक्तिक मुलाखती घेतल्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट तसेच मूट कोर्टसंबंधित परीक्षेसाठी येऊन फिजिकल एफिशिएंसी टेस्ट पात्र करावे लागणार आहे.
राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार! ‘स्टडी इन महाराष्ट्र’ उपक्रमाचा आरंभइच्छुक उमेदवार www.hindustanpetroleum.com या HPCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फ्रेशर्ससाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून अनुभवी उमेदवारांसाठी अंतिम मुदत 15 जुलै 2025 आहे.
हेही वाचा :