बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक(opportunity) मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर या पदासाठी तब्बल ३३२३ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ मे २०२५ आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊन आपला अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी. मेडिसिन , अभियांत्रिकी , चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये (opportunity) पदवी असलेले उमेदवारही या पदासाठी पात्र आहेत.अर्जदारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, म्हणजेच त्यांचा जन्म १ मे १९९५ ते ३० एप्रिल २००४ या कालावधीत झालेला असावा. सामान्य , ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ७५० रुपये आहे, तर एससी , एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा युपीआयद्वारे ऑनलाइन भरावे लागेल. अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, ‘Careers’ विभागावर क्लिक करावे. तेथे ‘SBI CBO २०२५ अर्ज लिंक’ शोधून त्यावर क्लिक करावे. त्यानंतर, आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल (opportunity) आयडीसह नोंदणी करून, शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरावी. आवश्यक कागदपत्रे – स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून, अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा.
उमेदवारांची निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये पार पडेल. यामध्ये सर्वप्रथम ऑनलाइन चाचणी घेतली जाईल. त्यानंतर, स्क्रीनिंग प्रक्रिया, मुलाखत आणि स्थानिक भाषेतील प्रवीणता चाचणी होईल. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी निवड केली जाईल.निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला इतर भत्त्यांसह ४८,४८० रुपये इतके मूळ वेतन मिळेल. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक सविस्तर माहितीसाठी, उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात आणि माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे.
हेही वाचा :
रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम
निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा
‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था
