बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण यकृत निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात.(beneficial )पण अशा लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की तेल खावे की तूप खावे. त्यांनी जाणून घ्या नेमकं काय करावे.तेल आणि तूप यांना अनेकदा दोष दिला जातो, परंतु योग्य प्रमाणात वापरल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक नाहीत. ते विषारी नाहीत, पण त्यांचा वापर संतुलित आणि नियंत्रित असावा.
तेल आणि तूप यांच्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.(beneficial ) जर यांचा अतिरिक्त वापर केला तर शरीरात कॅलरीज जमा होऊन वजन वाढते, ज्यामुळे फॅटी लिव्हरसारख्या समस्या उद्भवू शकतात.यकृताच्या आरोग्यासाठी, दिवसभरात 1-2 चमचे तूप पुरेसे आहे. तेल आणि तूप एकत्र वापरत असाल तर एकूण 3-4 चमच्यांपेक्षा जास्त नको.
“आवश्यक तितकेच पुरेसे” हा नियम यकृताच्या निरोगीपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे(beneficial ). जास्त प्रमाणात सेवन टाळणे हा यकृताच्या आरोग्याचा मूलमंत्र आहे. तेल आणि तूप यांचा वापर मर्यादित ठेवून यकृताचे आरोग्य राखता येते. तुमच्या आहारात त्यांचा समावेश करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :