केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा खूप जास्त अवघड असते. ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. देशातील(commission) सर्वात अवघड परीक्षांपैकी एक परीक्षा ही आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. परंतु अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु आयएएस अनुपमा अंजली यांनी खूप मेहनत घेतली आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
आयएएस होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे सेल्फ स्टडी, आत्मविश्वास, धीर आणि स्ट्रॅटेजी. जर या सर्व गोष्टींचा योग्य मेळ बसला की तुम्ही यूपीएससी परीक्षा करु शकतात.
आयएएस अनुमपा अंजली आहेत तरी कोण?(IAS Anupama Anjali)
आयएएस अनुमपा अंजली या मूळच्या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले.(commission) त्यांनी शाळेनंतर मॅकेनिकल इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर तिने सिविस सर्व्हिसच्या परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.
अनुपमा अंजली यांनादेखील पहिल्या प्रयत्नात अपयश आले परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी(commission) परीक्षा क्रॅक केली.
दुसऱ्या प्रयत्नात यश
अनुपमा यांनी दुसऱ्या प्रयत्नात २०१७ मध्ये यूपीएससी (UPSC)परीक्षेत यश मिळाले. त्यांना ३८६ रँक मिळाली होती. यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या. त्यांच्या या यशामुळे सर्वांनाच आनंद झाला.
डॅशिंग IPS ऑफिसर अंजली विश्वकर्मा! ४८ लाखांची नोकरी सोडली, दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
वडीलदेखील होते IPS (IAS Anupama Father was IPS )
अनुपमा यांचे वडीलदेखील सिनियर आयपीएस अधिकारी होते. त्यांचे आजोबादेखील सरकारी अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबातील अनेकजण सरकारी अधिकारी होते. त्यामुळेच त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सिविल सर्व्हिस जॉइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
हेही वाचा :