सोनं 12,000 रुपयांनी स्वस्त होणार?

एप्रिल आणि मे महिन्यांत सोन्याच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाल्यानंतर, आता तज्ज्ञांनी संभाव्य मोठ्या घसरणीचा इशारा दिला आहे.(cheaper ) सध्या प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ९७,००० रुपयांवर असून येत्या काळात ती सुमारे १२,००० रुपयांनी घसरून ८० ते ८५ हजारांच्या दरम्यान पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.केडिया अ‍ॅडव्हायझरीजचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी सांगितले की, सोन्याच्या किमती वाढल्यानंतर नफावसुलीसाठी विक्रीचा दबाव वाढतो. त्यामुळे दरात घट होण्याची शक्यता असते. काही दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही सोन्याचे दर घसरले होते. त्यामुळे जागतिक आणि स्थानिक घटनांचा मोठा परिणाम सोन्याच्या बाजारावर दिसून येतो.

सोन्याच्या किमतीतील संभाव्य घसरणीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे ग्लोबल घडामोडी आणि राजकीय तणाव कमी होणे. अमेरिकेकडून व्यापार धोरणातील नरमाईची भूमिका आणि भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत नाहीत.(cheaper )दुसरे कारण म्हणजे आरबीआयची संभाव्य धोरणात्मक पावले. ६ जून रोजी आरबीआयची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत चलनविषयक बदलांचा अप्रत्यक्ष परिणाम सोन्याच्या दरांवर होतो.

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फेडवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव होता. (cheaper )परंतु सध्या फेड व्याजदर कमी करेल अशी शक्यता कमी आहे. अशा वेळी सोन्याला मोठा आधार मिळत नाही आणि दर कमी होऊ शकतात.सध्या सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी बाजाराचा प्रवाह पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे. लवकरच सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल.

हेही वाचा :