प्रत्येकजण आपल्या मासिक पगारातून काही रक्कम बाजूला काढून गुंतवणूक करतात.(pension ) अनेक योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे भविष्यात पैशांची अडचण येणार नाही. तुम्ही एलआयसीच्या जीवन शांती प्लानमध्ये गुंतवणूक करु शकतात.एलआयसीचा हा रिटायरमेंट प्लान आहे. यामध्ये तुम्ही वर्षाला १ लख रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.
जर तुम्हाला आता गुंतवणूक करायची असेल तर एलआयसीची ही योजना एकदम परफेक्ट आहे. .(pension ) या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला किती परतावा मिळणार हे अवलंबून असते. तुम्हाला सेवानिवृत्तींतर पेन्शन किती मिळणार आणि किती नाही हे यावर अवलंबून असतं.
एलआयसीची ही योजना ३० ते ७९ वयोगटासाठी असणार आहे. या योजनेत कोणतेही रिस्क कव्हर केले जाणार नाही परंतु मिळणारा फायदा खूप मोठा असेल. या योजनेत तुम्ही डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल अॅन्युटी आणि डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ असा ऑप्शन निवडू शकतात. जर कोणाला सिंगल प्लानमध्ये गुंतवणूक करायची तर ते त्यात गुंतवणूक करु शकतात.
एलआयसीच्या या योजनेत जर ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये जमा केले आणि पाच वर्षांसाठी ही रक्कम गुंतवली तर तुम्हाला दर वर्षी १,०१,८८० रुपये पेन्शन मिळणार आहे..(pension ) सहा महिन्याला तुम्हाला ४९,९११ रुपये पेन्शन मिळणार आहे तर महिन्याला ८,१४९ रुपये पेन्शन मिळणार आहे.न्यू जीवन शांती योजनेत व्याजदर बदलत असतात. या योजनेत तुम्ही १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात.जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करु शकतात. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर ही रक्कम नॉमिनीला दिली जाते.
हेही वाचा :