सर्वसामान्यांसाठी गूड न्यूज!घरांच्या किमती कमी होणार

घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.(house)सिडकोच्या ‘माझे पसंतीचे घर’ योजनेतून विक्री न झालेल्या हजारो घरांमुळे अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विधानपरिषदेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्पष्ट केलं की, सिडकोच्या घरांच्या किमती 25 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.‘माझे पसंतीचे घर’ योजनेत सिडकोने सुमारे 26,000 घरे लॉटरीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केली होती. मात्र वाढलेल्या किमतीमुळे नागरिकांनी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. परिणामी जवळपास निम्मी घरे विक्रीविना पडून आहेत. विधान परिषदेतील चर्चेदरम्यान याच मुद्द्यावर सदस्यांनी आवाज उठवला.

विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. (house)या चर्चेत प्रवीण दरेकर यांनीही भाग घेतला. त्यांच्या मागणीवर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, “सिडको ही नफा मिळवणारी संस्था नसून सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं उपलब्ध करून देणे हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळेच सिडकोला घरांच्या किमती कमी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले जातील.”

सिडकोच्या योजनेत आधीच पैसे भरलेले अर्जदार घर मिळण्यापासून वंचित राहणार नाहीत,(house) असंही उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केलं. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार असून त्यात सिडकोच्या किंमती आणि धोरणांचा पुनर्विचार केला जाईल,” असंही सामंत यांनी सांगितलं.उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी ही महत्त्वाची माहितीही दिली की, “सिडकोमार्फत यापूर्वी जाहीर केल्यानुसार 322 चौ.फूटाचीच घरे दिली जातील, त्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही.” या निर्णयामुळे सध्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :