दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha, नोट करा रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही (recipe)तुम्हाला पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पनीर पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो.

सर्वच महिलांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पडणारा पहिला प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी कोणता पदार्थ बनवावा. नेहमीच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. तसेच अनेक लोक वजन वाढेल या भीतीने (recipe) सकाळचा नाश्ता करणे टाळताता. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. हाय प्रोटीन युक्त पनीर खाल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते. तसेच पनीर खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. घाईगडबडीच्या वेळी झटपट कोणताही पदार्थ बनवण्याचा असेल तर तुम्ही पनीर पराठा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
गव्हाचं पीठ
तेल
पनीर
कांदा
हिरवी मिरची
कोथिंबीर
लाल तिखट
चाट मसाला
गरम मसाला
आमचूर पावडर
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा लहान मुलांच्या आवडीचा मिक्स सॉस पास्ता, पदार्थाला लागेल भन्नाट चव

कृती:
पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि थोडस तेल टाकून मिक्स करा.
नंतर मिक्स केलेल्या पिठात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या आणि वरून पिठाला तेल (recipe) लावून काहीवेळासाठी बाजूला ठेवा.
मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
गव्हाच्या पिठाचा छोटा गोळा करून त्यात तयार केलेले पनीरचे मिश्रण भरून पराठा लाटून तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर पराठा. घरातील सगळ्यांचं पनीर पराठा खूप जास्त आवडेल.

हेही वाचा :