विवाहित महिलांना पतीकडून हव्या असतात ‘या’ 3 गोष्टी, जाणून घ्या चाणक्यांचा सल्ला

आचार्य चाणक्य हे केवळ मौर्य साम्राज्याचे कुटनीतीकार नव्हते, तर ते एक महान नीतीशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ देखील होते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती या ग्रंथात जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले आहे. त्यात संसार, नातेसंबंध आणि वैवाहिक(married) जीवनावर देखील चाणक्यांनी मोलाचे विचार मांडले आहेत.

विवाहित(married) स्त्री आणि पुरुष यांच्यात नातं जपण्यासाठी काय गरज असते? पत्नीला पतीकडून काय अपेक्षित असतं? यावर चाणक्य यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत – प्रामाणिकपणा, प्रेम आणि आदर.

प्रामाणिकपणा – विश्वासाचं पहिलं पाऊल :
चाणक्य म्हणतात, प्रामाणिक नातं हेच मजबूत संसाराचं खऱ्या अर्थाने पायाभूत तत्व आहे. विवाहानंतर प्रत्येक पतीने आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहावं. तुमचं तिच्याशी असलेलं वचन, नात्याची निष्ठा आणि समर्पण टिकवणं हे एक मूलभूत कर्तव्य आहे.

जेव्हा पती आपल्या पत्नीबद्दल प्रामाणिक असतो, तेव्हा ती स्वतःला सुरक्षित, सन्मानित आणि महत्त्वाची समजते. त्यामुळे दांपत्य जीवनातील अनेक समस्यांना सुरुवातीलाच आळा बसतो, असं चाणक्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रेम – भावनिक आधाराची गरज :
प्रेमाविना कोणतंही नातं दीर्घकाळ टिकू शकत नाही, असं चाणक्य म्हणतात. पत्नीला पतीकडून मोठ्या अपेक्षा नसतात, मात्र ती एवढं मात्र जरूर अपेक्षित असते की, तिच्यावर मनापासून प्रेम केलं जावं.

प्रेम केवळ मनात ठेवलं जाऊ नये, तर ते कृतीतूनही व्यक्त व्हावं, असा सल्ला चाणक्य देतात. जेव्हा एक पती आपल्या पत्नीवर प्रेम करतो आणि ते व्यक्त करतो, तेव्हा संसारामध्ये आपोआपच गोडवा निर्माण होतो.

आदर – नात्याचा आत्मा :
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर. चाणक्य म्हणतात, “जसा आदर तुम्ही दुसऱ्याला देता, तसाच तो तुम्हाला परत मिळतो.” विवाहित आयुष्यात पतीने आपल्या पत्नीचा आदर करायला हवा.

छोट्या गोष्टीतून वाद, तुंबळ भांडणं होऊ नयेत यासाठी अहंकार टाळणं गरजेचं आहे. जोडीदाराच्या मताला महत्त्व देणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, यामुळे दोघांमध्ये समजूतदारपणा वाढतो आणि नातं अधिक मजबूत होतं.

चाणक्यांनी सांगितलेलं सूत्र आजही तितकंच प्रभावी :
चाणक्य नीतीमधील या तीन गोष्टी – प्रामाणिकपणा, प्रेम आणि आदर – या आजच्या युगातही तितक्याच प्रभावी आहेत. प्रत्येक विवाहित पुरुषाने या गोष्टी पाळल्या, तर नात्यांमध्ये निर्माण होणारे गैरसमज, वाद, दुरावा यांना सहज थोपवता येईल आणि एक सुखी संसार घडू शकेल.

हेही वाचा :