ओला-उबर चालकांचा संप? जाणून घ्या मागण्या आणि समस्या

मुंबईतील ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप आधारित कॅब सेवांचे चालक गेल्या काही दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे रोजच्या प्रवासावर विसंबून असणाऱ्या मुंबईकरांना मोठा फटका बसत आहे. हा संप केवळ आर्थिक मागण्यांपुरता मर्यादित नसून चालकांच्या(drivers ) हक्कांसाठीचा संघर्ष आहे.

संपाचा प्रमुख कारण – कमी कमाई आणि जास्त कमिशन :
सध्या ओला आणि उबरचे चालक प्रति किलोमीटर फक्त ₹८ ते ₹१२ इतकीच कमाई करतात. यामध्ये पेट्रोल, वाहन देखभाल, EMI आणि कौटुंबिक खर्च पूर्ण करणं अशक्य होतं. त्यातच कंपन्या ३०% ते ४०% पर्यंत कमिशन घेतात, ज्यामुळे चालकांच्या(drivers ) हाती फार कमी रक्कम उरते.

चालकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या? :
प्रति किलोमीटर भाडे वाढवणे: पारंपरिक टॅक्सीप्रमाणे किमान ₹१८ प्रती किलोमीटर दर द्यावा.

कमिशन कमी करणे: सध्या ३०-४०% असलेले कमिशन १०-१५% पर्यंत आणावे.

एग्रीगेटर धोरणाची अंमलबजावणी: महाराष्ट्र सरकारचे 2020 मधील धोरण अद्याप लागू नाही.

गिग वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा: ‘गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स वेलफेअर ॲक्ट’ची अंमलबजावणी करावी.

बाईक टॅक्सींवर बंदी: वाढत्या बाईक टॅक्सीमुळे मोठ्या कॅब चालकांचे उत्पन्न घटले आहे.

संपाचा परिणाम कुठे जाणवतोय? :
या संपाचा सर्वाधिक फटका खालील भागांना बसतोय:

मुंबई विमानतळ
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)
अंधेरी व जुहू परिसर
दक्षिण मुंबई

प्रवासासाठी इतर पर्याय शोधावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडत आहे.

सरकारकडून लेखी आश्वासन मिळालं का? :
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि Indian Gig Workers Front यांच्या नेतृत्वाखाली संप सुरू आहे. चालकांनी परिवहन विभागाशी चर्चा केली असली तरी अद्याप कोणतेही लेखी किंवा ठोस आश्वासन मिळालेले नाही. तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जोपर्यंत सरकार भाडेवाढ, कमिशन कपात आणि सामाजिक सुरक्षेसंदर्भात लिहित निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार चालकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :