एस. एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने भारतीय सिनेमा नव्याने परिभाषित केला. विशेष म्हणजे या चित्रपटाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने तो पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या दोन्ही भागांना ‘बाहुबली(Bahubali): द एपिक’ या नावाने 31 ऑक्टोबर रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामुळे जुन्या चाहत्यांसोबत नव्या पिढीलाही हा अनुभव मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.
चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पुन्हा एकदा तो प्रश्न व्हायरल झाला आहे- ‘कटप्पाने बाहुबलीला(Bahubali) का मारलं?” या प्रश्नाने 2015 पासून प्रेक्षकांच्या मनात एक प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. या प्रश्नावर सोशल मीडियावर हजारो मीम्स, चर्चा आणि युक्तिवाद झडले होते. आता त्याच प्रश्नावर अभिनेता राणा दग्गुबाती आणि प्रभासने मजेदार पद्धतीने उत्तर दिलं आहे.
बाहुबलीच्या X अकाउंटवर एक पोस्ट आली – ‘जर कटप्पाने बाहुबलीला मारलं नसतं, तर काय झालं असतं?’ यावर राणाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर उत्तर दिलं – ‘मी त्याला मारलं असतं!’. त्याचं हे उत्तर पाहून चाहतेही हसू लागले. प्रभास, ज्याने बाहुबलीची मुख्य भूमिका साकारली, त्याने देखील या स्टोरीला रिपोस्ट करत उत्तर दिलं- ‘म्हणूनच मी ते होऊ दिलं!’ त्याचं हे उत्तर देखील सोशल मीडियावर तितकंच व्हायरल झालं आणि चाहते दोघांच्या या संवादामुळे खूप हसू लागले. राणाने त्यानंतर पुन्हा प्रभासची स्टोरी शेअर करत लिहिलं- ‘अहाहा बाहू, छान खेळलास!’
‘बाहुबली: द बिगिनिंग’ चा शेवट प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरला होता. जेव्हा कटप्पा, जो महिष्मती साम्राज्याचा सर्वात निष्ठावंत सेवक मानला जातो, तो अचानक अमरेंद्र बाहुबलीचा(Bahubali) वध करतो, ते दृश्य पाहून प्रेक्षकांना गहिवरून आलं होतं. हा सीन इतका प्रभावी होता की ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’ हा प्रश्न घराघरात पोहोचला. या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांनी तब्बल दोन वर्षं वाट पाहिली. अखेर 2017 मध्ये आलेल्या ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’ मध्ये हे रहस्य उलगडलं. दुसऱ्या भागाने सर्व विक्रम मोडीत काढत जवळपास 1,700 कोटींची कमाई केली, तर पहिल्या भागाने सुमारे 650 कोटी कमावले होते. हे दोन्ही चित्रपट मिळून अंदाजे 2,350 कोटींची कमाई करत भारतीय सिनेसृष्टीला एका नव्या शिखरावर घेऊन गेले.
या चित्रपटात प्रभास आणि राणा दग्गुबतीसोबत अनुष्का शेट्टी, सत्यराज, राम्या कृष्णन, नास्सर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. भव्य सेट्स, उत्तम संगीत, प्रभावी कथानक आणि VFX मुळे ‘बाहुबली’ चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा चित्रपट ठरला.
हेही वाचा :