सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. चार्जिंगवर चालणाऱ्या(electric) या गाड्यांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी खर्च येतो. शिवाय पेट्रोल आणि डिझेलसारखे मर्यादित स्त्रोत वाचवण्यासाठी याला पर्याय आणणं गरजेचं आहे. त्यामुळे लोक आता इकोफ्रेंडली गाड्या म्हणून इलेक्ट्रिक गाड्यांकडे पाहात आहेत. पण या गाड्या खरंच ‘इकोफ्रेंडली’ म्हणजे ‘पर्यावरणपूरक’ आहेत का?
भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जात आहे. पण अलीकडेच काही संशोधनात असे स्पष्ट झालं आहे की, इलेक्ट्रिक गाड्या प्रत्यक्षात पर्यावरणासाठी फारशा फायदेशीर नाहीत. उलट काही बाबतींत त्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे यांचा वापर वाढणं (electric)पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतं. तरीही या गाड्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत यांच्या माध्यमातून तयार झालेल्या विजेवर चालल्या तर अधिक फायदेशीर आहे. तरीही या गाडीतील बॅटऱ्यांमध्ये वापरली जाणारी मूलद्रवे आणि ती निसर्गातून मिळवण्याची पद्धत यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जात आहे. पण अलीकडेच काही संशोधनात असे स्पष्ट झालं आहे की, इलेक्ट्रिक गाड्या प्रत्यक्षात पर्यावरणासाठी फारशा फायदेशीर नाहीत. उलट काही बाबतींत त्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त हानिकारक ठरू शकतात.
इलेक्ट्रिक गाड्या (EV) खरंच “ग्रीन” आहेत का?
इलेक्ट्रिक गाड्यांचं मुख्य वैशिष्ट्य असं मानलं जातं की, त्या धावताना कोणतंही कार्बन उत्सर्जन करत नाहीत. (electric)त्यामुळे वायुप्रदूषण कमी होतं, असा विश्वास आहे. मात्र, एक नवीन रिपोर्ट सांगतो की, एका EV कारचं एकूण कार्बन उत्सर्जन पारंपरिक गाड्यांपेक्षा 46% अधिक असू शकतं. दुसरीकडे, पेट्रोल-डिझेल गाड्यांचं उत्सर्जन हे सुमारे 26% इतकं असतं.
इलेक्ट्रिक गाड्यांचा चेसिस, बॉडी आणि इतर भाग हे पारंपरिक गाड्यांसारखेच असतात. मुख्य फरक असतो तो म्हणजे बॅटरी. EV गाड्यांमध्ये लिथियम-आयन बॅटरी असते, जी रेअर अर्थ मेटल्सपासून तयार केली जाते. एका EV बॅटरीमध्ये साधारणपणे:
8 किलो लिथियम
8 ते 10 किलो कोबाल्ट
35 किलो मॅंगनीज यांसारख्या धातूंचा वापर होतो. हे मेटल्स मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन करावं लागतं, ज्यामुळे पर्यावरणावर फार मोठा परिणाम होतो.विशेषतः कोबाल्ट आणि निकेल यांच्या खाणीतून होणारं प्रदूषण गंभीर आहे.
हेही वाचा :
- भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज! मालिकेत टीम इंडीयाची 1-0 अशी आघाडी
- 20 जुलै रोजी रविवारी तिन्ही मार्गांचा मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी ‘हे’ वाचा
- सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या भावात घसरण! जाणून घ्या आजच्या किंमती
- वैष्णवी हगवणे न्यायप्रकरणी मोठा ट्विस्ट! IPS सुपेकर सहआरोपी करण्याच्या शिफारशीने खळबळ