मे महिन्यात दमदार हजेरी लावलेला पाऊस जून-जुलैमध्ये गायब झाल्याने उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडले जात आहे. (water)सध्या उजनी धरण ९४.६५ टक्के भरले असून धरणात सध्या ११४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. दौंडवरून उजनीत येणारी आवक कमी झाल्याने भीमा नदीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे.
२६ मेपर्यंत उणे पातळीत असलेले उजनी धरण २७ मे रोजी प्लसमध्ये आले. उजनी धरण व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार जुलैअखेर उजनीत ९४ टक्के पाणीसाठा अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या उजनी धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाला असून आता दौंडवरून येणाऱ्या विसर्गाएवढेच पाणी कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजना व विद्युतनिर्मिती(water) प्रकल्पासाठी सोडले जात आहे. मुसळधार पावसाचा जवळपास ४० ते ५० दिवसांपासून खंड पडल्याने उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग सध्या पूर्णत: बंद करण्यात आला आहे.
सध्या धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पास १६०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून १८० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८० क्युसेक, बोगद्यातून ८०० क्युसेक आणि कालव्यातून २१०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दौंडवरून पाण्याची आवक सुरू असल्याने कालव्यातून पाणी सुरूच राहणार आहे.
पावसाळा संपायला आणखी दोन महिने शिल्लक असल्याने उजनीतून पाणी सोडले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (water)दौंडवरून येणारा संपूर्ण विसर्ग उजनीत साठविल्यास धरण अवघ्या आठ-दहा दिवसांत १०० टक्के भरेल, असेही अधिकारी म्हणाले.
एक महिन्यापासून कालव्यातून पाणी
उजनीतून २१ जून रोजी कालव्यातून ५०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. तेव्हापासून कालव्याद्वारे पाणी सुरू असून सध्या २१०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. सुरवातीला पावसामुळे कालव्याचे पाणी बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. पण, आता पावसाचा खंड पडल्याने त्याच कालव्याच्या पाण्याचा पिकांना आधार आहे.
हेही वाचा :