सभागृहात पॉर्न पाहणारा नेत्याला भाजपनं उपमुख्यमंत्री केलं

लक्ष्मण सावदी 2012 मध्ये कर्नाटक विधानसभा सभागृहात पॉर्न पाहताना सापडले होते आणि त्यानंतर राजीनामा दिला होता.(leader)पराभूत होऊनही भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रिपद देत राजकीय आश्चर्य निर्माण केलं.आता सावदी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नव्या राजकीय भूमिकेत आहेत.सभागृहात रम्मी खेळल्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या जारीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. विधानसभा सभागृहात पॉर्न पाहणारा नेता पुढं थेट राज्याचा उपमुख्यमंत्री झाला होता. कर्नाटकच्या राजकारण तेव्हा देशभरात चर्चेचा विषय बनलं होतं. भारतीय जनता पक्षाने भाजप लक्ष्मण सावदी यांना उपमुख्यमंत्रिपद बनवलं होतं.

विशेष म्हणजे, सावदी हे 2012 मध्ये विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहताना आढळले होते. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, त्यानंतर थेट उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता ते काँग्रेसमध्ये आहेत.लक्ष्मण सावदी हे कर्नाटकच्या लिंगायत समाजातील प्रभावी नेते मानले जातात. बेलगावी जिल्ह्यातील अथणी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा आमदारकी मिळवली होती. मात्र, 2018 च्या निवडणुकीत त्यांना याच मतदारसंघातून दोन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तरीही, मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

कर्नाटकातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडीत लक्ष्मण सावदी यांनी ‘ऑपरेशन लोटस’ अंतर्गत महत्त्वाची भूमिका बजावली होती.(leader)काँग्रेसच्या सहा आमदारांना भाजपच्या बाजूने वळवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या संगठनात्मक क्षमतेमुळे पक्षात त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले होते. सावदी यांनी 1990 च्या दशकात बेलगावी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तत्कालीन कामगारमंत्री ए.बी. जकनूर यांच्या मुलाला हरवून आपली राजकीय ताकद दाखवली होती.

सावदी यांच्या नियुक्तीला भाजपमध्येच विरोध झाला होता. भाजपचे आमदार आणि येदियुरप्पा यांचे सहकारी एम.पी. रेणुकाचार्य यांनी सावदी यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. “निवडणूक हरलेल्या व्यक्तीला मंत्रिपद देण्याची गरज काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय, महिला संघटनांनीही सावदी यांच्या नियुक्तीचा तीव्र निषेध केला होता. त्यांच्यावर 2012 मध्ये झालेल्या पॉर्न प्रकरणामुळे टीकेची झोड उठली होती.प्रोफेसर त्रिलोचन शास्त्री, एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स एडीआर यांचे अध्यक्ष, यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. “राजकारणात आता पैसा, मतं किंवा आमदार असणाऱ्यांचाच बोलबाला आहे. हा लोकशाहीसाठी धोकादायक ट्रेंड आहे,” असे ते म्हणाले होते.

2012 च्या पॉर्न प्रकरणावर सावदी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते, “मी रेव्ह पार्टीबद्दल माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पाहत होतो.”(leader) मात्र, या प्रकरणाने मोठा गदारोळ झाल्याने त्यांना आणि इतर दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारताना सावदी म्हणाले, “मी हे पद मागितले नव्हते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला ही जबाबदारी दिली आहे. मी पक्षाला बळकट करेन आणि सरकार चांगले काम करेल.”कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समाजाचे 18 टक्के लोकसंख्येचे प्रमाण आहे. सावदी यांच्यासारख्या प्रभावी लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपने हा समाज आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सावदी यांच्या नियुक्तीमुळे पक्षांतर्गत आणि सामाजिक पातळीवर निर्माण झालेला वादाने कर्नाटकच्या राजकारणात नव्या चर्चांना जन्म दिला होता.

हेही वाचा :