पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या घरी स्फोट पोलीस पोहोचताच घर झालं उद्ध्वस्त

पहलगाम हल्ल्याच्या तपासात एक मोठी घडामोड (destroyed)समोर आली आहे. या हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल ठोकर याच्या घरी पोलीस तपासणीसाठी गेले असता, घरात मोठा स्फोट होऊन घर उद्ध्वस्त झाले. पोलिसांनी वेळीच धोका ओळखल्याने जीवितहानी टळली. दुसरीकडे, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे.पहलगाम हल्ल्याप्रकरणी आसिफ शेख आणि आदिल ठोक उर्फ आदिल गुरी यांची नावे संशयित म्हणून समोर आली आहेत. सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस आदिलच्या बिजबेहारा येथील गुरी भागातील घरी तपासणीसाठी गेले होते. घरात संशयास्पद वस्तू आढळल्याने आणि धोका जाणवल्याने पोलीस तात्काळ घराबाहेर पडले.

पोलीस बाहेर पडताच घरात मोठा स्फोट झाला, ज्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. घरात स्फोटके ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी (destroyed)असलेला आदिल २०१८ मध्ये कायदेशीर मार्गाने पाकिस्तानात गेला होता व तेथे दहशतवादी प्रशिक्षण घेऊन गेल्या वर्षीच काश्मीरमध्ये परतल्याचा आरोप आहे. पहलगाम हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे मानले जाते.

एकीकडे तपास सुरू असताना, पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या काही भागांवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कराने या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिले असून, यात कोणतेही नुकसान झालेले नाही. तथापि, पहलगाम हल्ल्यानंतर सीमेवरील वातावरण तणावपूर्ण बनले आहे (destroyed)आणि लष्कर हाय अलर्टवर आहे.या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच श्रीनगर आणि उधमपूरला भेट देणार आहेत. ते सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतील. यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगामला भेट दिली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीसीएसची बैठक घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले होते.

हेही वाचा :

कोल्हापूर विनयभंगप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी घरात बोलावून मुलीशी अश्‍‍लील चाळे

महिलेने 14 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट दातांनी चावला आणि मग जे घडले ते भयंकरच

उष्णतेच्या झळा अन् गारपिटीचं संकट एकाचवेळी! हवामान खात्याचा 9 जिल्ह्यांना इशारा

शुबमन गिल लवकरच लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!