सकाळी ११ वाजल्यापासून १४०० क्युसेक्स इतक्या दराने पाणी सांडव्यावरून पवना नदीपात्रात विसर्ग करण्यात (basin)येत आहे. हवामानानुसार व येव्यानुसार हा विसर्ग कमी-जास्त केला जाण्याचा अंदाज आहे.
पिंपरी: पवना व मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात (basin)लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, पवना आणि मुळशी धरणातून नियंत्रित पद्धतीने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पवना धरण ८३.१६ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणामध्ये मोठा येवा सुरू आहे. यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून १४०० क्युसेक्स इतक्या दराने पाणी सांडव्यावरून पवना नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. हवामानानुसार व येव्यानुसार हा विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुळशी धरणही ८१.९१ टक्के भरले असून, सायंकाळी ४ वाजेपासून धरणातून ९१०० क्युसेक्स इतक्या मोठ्या (basin)प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची पातळी ६०४.७१ मीटर असून, एकूण साठा ४६७.४९२ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. मुळशी भागात गुरुवारी २७ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण २३७४ मिमी पाऊस झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच शेती अवजारे, पंप, जनावरे इत्यादी नदीकाठी असल्यास ती तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. सखल भागातील रहिवाशांना स्थानिक प्रशासनाने सूचना देण्यास सुरुवात केली असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पवना धरणात सायंकाळी ४ वाजता जलपातळी ६११.५२ मीटर (2006.30 फूट) इतकी नोंदवली गेली आहे. धरणाची एकूण क्षमता ८२७५.०० दशलक्ष घनफूट असून, त्यातील ७१७५.०० McFt इतका साठा झाला आहे. यामुळे साठा टक्केवारीने ८४.२८% इतका झाला आहे. दिवसभरात ४ मिमी तर आतापर्यंत एकूण १५६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणातून सध्या जलविद्युत निर्मितीसाठी कोणताही विसर्ग नाही. मात्र, स्पिलवेद्वारे १५०० क्युसेक्स इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे.
गेले काही दिवस पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील धरणसाखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच होती. मात्र आता या पावसाचा पाणलोट क्षेत्रातील जोर वाढला असल्याने मुळशी आणि पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
हेही वाचा :