मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे(political news) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी क्लीनचिट मिळाली आहे. याच क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका’, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला दिला.
अंजली दमानिया यांनी माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तब्बल 245 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी त्यांच्या काळात झालेल्या कृषि साहित्याच्या अधिक दराने केलेल्या खरेदीवर बोट ठेवले होते. पण मुंबई उच्च न्यायालयाने ही खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची(political news) मान्यता घेऊनच राबवण्यात आल्याचे नमूद करत एकप्रकारे त्यांना क्लीनचिट दिली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेद्वारे आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचेही संकेत दिले आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या की, हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला. पण मी त्यांनी घोटाळा केल्याच्या माझ्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्रुटी शोधून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम वकिलांनी अत्यंत हुशारीने हे प्रकरण मांडले. या प्रकरणी जे दोन जीआर कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रकरणी शासनाच्या होते ते वेगवेगळ्या विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हा युक्तिवाद चुकीचा होता. या प्रकरणात कुठेही भ्रष्टाचाराचा उच्चार करण्यात आला नाही. भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही. त्यामुळे न्यायालयातून मुंडेंना क्लीनचिट मिळाली असे म्हणता येत नाही.
या संपूर्ण प्रकरणाला आव्हान देण्याची गरज आहे. हा विषय सुप्रीम कोर्टात मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोकायुक्तांपुढे सुरू आहे. याप्रकरणी कृषी खात्याच्या तत्कालीन सचिव व्ही. राधा यांचा अहवालही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनी एकदा नव्हे तर 8 वेळा हे चुकीचे असल्याचा दावा केला होता.
हेही वाचा :