सीमेवर जायला निघाली आई, लेकाच्या मिठीतलं दुःख पाहून काळीज भरून येईल video viral

पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. (heartbroken)या तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरातील सर्व सुरक्षा दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक बीएसएफच्या जवानांना सीमेवर तातडीने तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यात रेश्मा इंगळे यांचाही समावेश होता. मात्र, सीमेवर जात असताना लेकराला सोडताना त्यांना अश्रु अनावर झाले.रेश्मा इंगळे या बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्या अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर त्यांना सीमेवर हजर राहण्याचे आदेश मिळाले. त्यांनी तातडीने सीमेवर राहण्याची तयारी दर्शवली.

त्यांना एक वर्षांचा चिमुकला आहे. त्याला सोडून जाताना रेश्मा यांना अश्रु अनावर झाल्या. रेश्मा इंगळे या सुट्टीवर आपल्या घरी, आपल्या एका वर्षाच्या चिमुकल्या बाळासोबत वेळ घालवत होत्या. (heartbroken)मात्र, देशसेवेचे व्रत जपण्यासाठी त्यांना आपल्या लेकराला मागे ठेवून सीमेवर रवाना व्हावं लागलं.

आपली आई डोळ्यांदेखत निघून जाते हे पाहून चिमुरड्याने हंबरडा फोडला. (heartbroken) त्या क्षणी रेश्मा इंगळेंनाही अश्रू अनावर झाले. मन हेलावून टाकणाऱ्या या क्षणाचा एकाने व्हिडिओ शूट केला आणि समाजमाध्यमांवर शेअर केला. हे दृश्य उपस्थित प्रत्येकाचं काळीज हेलावून गेलं. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम

निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा

‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था