युद्धामध्ये माणूसकी जळून खाक; दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपटले थेट जमिनीवर, हृदयद्रावक व्हिडिओ समोर

रशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रशियाच्या शेरेमेत्येवो आतंरराष्ट्रीय विमानतळावर एक बेलारुसी पर्यटकाने दीड वर्षाच्या चिुकल्यासोबत धक्कादायक कृत्य केले आहे. या माणसाने एका चिमुकल्याला(child ) उचलून अत्यंत क्रूरपणे जमिनीवर आदळे आहे. सध्या या भयावर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण जगावा हादरवून टाकले आहे. सध्या चिमुकला कोमात असून मृत्यूशी झुंज देत आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक चिमुकला(child ) विमानतळावर बॅगजवळ उभा आहे. त्याच्या आसपास एक माणूस फिरताना दिसत आहे. मात्र या माणसाने अचानक असे धक्कादायक कृत्य केले आहे की ते चिमुकल्याच्या जीवावर बेतले आहे. या हैवानाने चिमुकल्याला उचलून जोरात जमिनीवर आपटले आहे. हा क्षण पाहून आजूबाजूला असणाऱ्यांचा देखील थरकाप उडाला आहे.

हा भयानक प्रकार रशियात घडला. राक्षसी वृत्तीच्या या माणसाने केलेल्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल-इराण युद्धादरम्यान चिमुकला आणि त्याची आई सुरक्षिततेच्या शोधात इराणहून अफगाणिस्तानमार्गे रशियाला गेले होते. रशियामध्ये पोहोताच या चिमुकल्यासोबत(child ) हे धक्कादायक घटना घडली.

सध्या विमानतळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी दारुच्या किंवा ड्रग्जच्या नशेत असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरु आहे. ३१ वर्षीय आरोपीची ओळख व्लादिमिर विटकोव्ह आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @vinnie_paz या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. अनेकांनी व्यक्तीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच बाळाच्या प्रकृतीवर चिंता व्यक्त केली आहे. हा भयावर व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हेही वाचा :