तलावात ट्रेंड फॉलो करणं पडलं महागात! पाण्यात हळद टाकताच बाहेर आला विषारी प्राणी Video

मागील काही काळापासून सोशल मीडियावर हळदीचा ट्रेंड फार लोकप्रिय ठरत आहे. यात काचेच्या पाण्यात पाणी(water) घेऊन त्यात हळद टाकली जाते आणि त्यांनतर घडून आलेले सुंदर दृश्य कॅमेरात कैद केले जाते. मात्र अलीकडेच एका तरुणाला हा ट्रेंड फॉलो करणं जरा जास्तीच महागात पडलं.

व्यक्तीने काहीतरी नवीन म्हणून हा ट्रेंड तलावाच्या पाण्यात(water) करू पहिल्या ज्यानंतर त्यातून विषारी सापच बाहेर आला. विषारी सापाने आपला फणा काढत तरुणावर हल्ला करू पाहिला ज्यांनंतर तरुणाची पळता भुई एक झाली. हे सर्वच दृश्य पाहायला फार मजेदार आणि हास्यास्पद वाटते. तरुणाची झालेली फजिती आता सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. यात एक तरुण तलावात उतरतो आणि त्यात एक चमचा हळद टाकतो हे दिसतंय. सुरुवातीला सगळं सामान्य दिसतंय, जणू काही तो पाण्यात हळद मिसळून एक सुंदर दृश्य टिपू इच्छितोय. पण पुढच्याच क्षणी जे घडतं ते आश्चर्यकारक आहे, तो तरुण हळद टाकताच अचानक एक साप त्याच्यावर हल्ला करतो.

हे पाहून तो तरुण घाबरतो आणि उलटे पाय धरून आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतो. पुढे पळता पळता त्याचा पाय निसटतो ज्यानंतर तो तलावाच्या किनारी पडतो पण परत उठून तो किनाऱ्याबाहेर जातो आणि आपला जीव वाचवतो. तरुणाची ही फजिती आता सोशल मीडियावर युजर्सच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanu Ansari (@sanu_ansari1222)

 

हा व्हायरल व्हिडिओ @sanu_ansari1222 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ सापाला हळद घालून दूध पाजत होता आणि दूध आणायला विसरला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मृत्यूला स्पर्श करून परत आला ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निष्काळजीपणाचे परिणाम पाहिलात”.

हेही वाचा :