ठाकरेंच्या गडाला सुरूंग; दोन बड्या नेत्यांचा उद्या भाजप प्रवेश निश्चित

राज्याच्या राजकीय वर्तुळात दिवसेंदिवस उलथापालथी घडत आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षासाठी पक्षबांधणीची तयारीही सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकांसाठीही(political news) सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष विरोधी पक्षांचे नेते फोडताना दिसत आहेत. अशाताच उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला सुरूंग लावण्यात सत्ताधारी भाजपला पुन्हा यश आल्याचे दिसत आहे. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी भाजपचे संभाव्य भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अपूर्व हिरे हे पूर्वी शिक्षक मतदार संघाचे आमदार होते. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता अपूर्व हिरे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून त्याचे भाजपच्या अंतर्गत गटराजकारणाशी मोठे संबंध जोडले जात आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे , सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा(political news) प्रवेशावर नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदार सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. त्यामुळे बडगुजर यांना राजकीय शह देण्यासाठी हिरे यांचा भाजपप्रवेश घडवून आणल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजप अधिक बळकट होणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही स्थिती चिंतेची ठरू शकते.

धुळ्याचे कुणाल पाटील हे काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रमुख नेते होते. या पट्ट्यात त्यांचा मोठा प्रभावही आहे. कुणाल पाटील यांच्या भाजपप्रवेशाने याठिकाणी भाजपची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, कुणाल पाटील हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण आता त्यांचाही पक्ष सोडण्याची निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कुणाल पाटील यांच्याही भाजपप्रवेशावर(political news) शिक्कामोर्तब झाले असून त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनाही त्यांच्या भाजप प्रवेशाचा निरोप पाठवण्यात आल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे. उद्या (१ जुलै) दुपारी दोन वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यानंतर विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेतले. बडगुजर आणि शिंदे यांच्या भाजपप्रवेशानंतर आता नाशिकमध्ये ठाकरे गट खिळखिळा झाल्याचे चित्र असून, शिंदे आणि बडगुजर यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील भाजपमध्ये सामील झाले आहेत.

या घडामोडींमुळे आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. भाजपने स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी आखलेला डाव यशस्वी होताना दिसत आहे. एकीकडे ठाकरे गटातील नेतृत्व निष्ठावंतांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे भाजपकडून नेत्यांच्या प्रवेशाची मालिका सुरूच असून, याचा राजकीय फायदा भाजपच्या पारड्यात पडतोय, असे बोलले जात आहे.

शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला(political news) आणखी एक धक्का बसण्याची चिन्हं आहेत. माजी आमदार विजय भांबळे हे उद्या (१ जुलै) अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते. नवाब मलिक यांच्या प्रयत्नातून भांबळे यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रवेशासाठी मुंबईत महिला विकास महामंडळाच्या कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. या प्रवेशामुळे मराठवाड्यातील राष्ट्रवादीतील गटबाजी अधिक स्पष्ट होत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटासाठी ही स्थिती चिंताजनक ठरू शकते.

हेही वाचा :