मुंबई: राज्याचं पावसाळी अधिवेशनाला आजपासून (30 जून) सुरुवात होणार आहे. याचपार्श्वभूमीवर काल पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह(politics) मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. चहापानाच्या कार्यक्रमातील एकनाथ शिंदेंचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे चांगलेच रागात दिसत आहे.

राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर रागावल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये मला काय विचारताय?, असा सवाल एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंना विचारतना दिसत आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या (politics)चेहऱ्यावर चांगलाच राग दिसून येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदेंचा हा वाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मागे दिसत आहे. दोघांमध्ये नेमकं काय घडलं?, याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत. त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे. विधिमंडळाचे अधिवेशन हे विविध समस्या आणि मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची उत्तम संधी असते. मंत्र्यांना विरोधकांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्न आणि समस्यांबाबत अधिकृतरित्या सर्वांसमोर भूमिका मांडावी लागते. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना अडचणीचे प्रश्न विचारु शकतात. सध्या राज्यात शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा गाजत आहे. त्यामुळे अधिवेशनात याचे पडसाद उमटू शकतात.
हेही वाचा :