‘डाकैत’च्या अ‍ॅक्शन सीनवेळी अपघात, मृणाल आणि आदिवी सेष जखमी

अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि आदिवी सेष सध्या त्यांच्या आगामी पॅन इंडिया प्रोजेक्ट ‘डाकैत’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मात्र, या चित्रपटाच्या(film) अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. हा अपघात हैदराबादमध्ये एका अ‍ॅक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान घडला. जो खूप मेहनतीचा आणि धोकादायक होता.

आदिवी सेषला डॉक्टरकडे पाठवण्यात आलं असून, मृणालने शूटिंग पूर्ण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्शन सीन करत असताना आदिवी सेष जखमी झाला. त्याला तत्काळ डॉक्टरकडे नेण्यात आलं आहे. दुसरीकडे, मृणाल ठाकूरने स्वतः जखमी असूनही शूटिंग सुरू ठेवत आपला शॉट पूर्ण केला. हे तिच्या प्रोफेशनलिझमचे उदाहरण मानले जात आहे.

मराठी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी अनेकदा अॅक्सन सीनच्या शूट वेळी अनेकदा अपघात होत असतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक पा. रणजीत यांच्या चित्रपटाच्या(film) सेटवर स्टंट करताना प्रसिद्ध स्टंटमॅन एस.एम. राजू यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला हादरवले आणि सुरक्षा व्यवस्था आणि स्टंट सिक्युरिटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ज्या नंतर अफवा असल्याचे स्पष्ट झाले. सध्या शाहरुख खान त्याच्या ‘किंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

‘डाकैत’ या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन शनील देव यांनी केलं आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि आदिवी सेषसोबत दिग्दर्शक अनुराग कश्यपही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते, जो आपल्या एक्स-गर्लफ्रेंडकडून फसवला गेल्यानंतर बदला घेण्यासाठी एक धोकादायक योजना तयार करतो. ही कथा प्रेम, प्रतिशोध आणि तुटलेल्या नात्यांच्या भावना खोलवर उलगडते. याआधी मृणालने ‘डाकैत’च्या सेटवरून काही बिहाइंड द सीन व्हिडीओ शेअर केले होते. ज्यामध्ये ती या भूमिकेसाठी किती मेहनत घेत आहे हे दिसून आले होते.

हेही वाचा :