राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल दोन महिन्यांपूर्वी जाहीर केल्यानंतरही, सीईटी सेलला प्रभावीपणे व्यावसायिक (delayed)अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा जलद आणि प्रभावीपणे राबविता आलेली नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत अजूनही नावनोंदणी सुरू आहे. याउलट खासगी आणि अभिमत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या जागा भरण्यासाठी सीईटी सेल धीम्या गतीने कारभार करीत असल्याचे चित्र आहे.
CET CELL admission 2025 Maharashtra: राज्य मंडळाने बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर केला. मंडळाने यंदा सर्वाधिक कमी कालावधीत हा निकाल जाहीर केला. अशा परिस्थितीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होऊन, त्या कमी कालावधीत पूर्ण होण्याची गरज होती. (delayed)मात्र, प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे धीम्या गतीने प्रवेश प्रक्रिया पुढे सरकत असल्याचे चित्र आहे.
सीईटी सेलकडून इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेऊन, त्यांचे निकाल जाहीर केले जातात. या निकालांच्या आधारावर तातडीने प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होण्याची आवश्यकता होती. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यानंतरही प्रवेश प्रक्रियेत नावनोंदणीच सुरू आहे.
काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची नावनोंदणीही अजून सुरू झालेली नाही. (delayed)या ६० दिवसांमध्ये प्रवेशाची पहिली फेरीही सीईटी सेलला राबविता आलेली नाही. त्यामुळे पहिल्या फेरीतून प्रवेशांसाठी ऑगस्ट महिना उजाडणार असल्याची शक्यता अधिक असून, प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत सीईटी सेलच्या प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा :