एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये केले इमर्जन्सी लँडिंग

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या(flight ) भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी (13 जून) थायलंडच्या फुकेत बेटावरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, फ्लाइट एआय ३७९ सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले.

बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमानाचे(flight ) आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान क्रमांक AI-379 थायलंडच्या फुकेतहून दिल्लीला येत होते.

हेही वाचा :