जगातील असा एकमेव देश जिथे भाड्यानं भेटते बायको

जगात असाही एक देश आहे, जिथे 15 दिवसांसाठी लग्न केलं जातं.(world) इथे 15 दिवसांच्या करारावर लग्न केलं जातं. करार समाप्त झाल्यानंतर लग्न देखील संपुष्टात येतं. या देशांमध्ये तरुणी देखील 15 दिवसांच्या लग्नासाठी तयार होतात, कारण त्यांना हे चांगलंच माहिती असतं की हे फक्त 15 दिवसांसाठीचं लग्न आहे. त्याबदल्यात त्यांना मोबदला देखील मिळतो. त्यामुळे त्यांची देखील या लग्नाला संमती असते.

या लग्नाला शॉर्ट टर्म मॅरेज असं देखील म्हटलं जातं, सुरुवातील ही प्रथा जागातील अनेक देशांमध्ये प्रचलित होती. मात्र आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच देश आहेत, ज्या देशांमध्ये आज ही प्रथा सुरू आहे. (world)इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात आजही या पद्धतीने लग्न होतात तर ईराण आणि ईराकमध्ये देखील काही प्रमाणात ही प्रथा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. इंडोनेशियामध्ये ही प्रथा सुरू आहे, इथे एक महिला वर्षातून कमीत -कमी 20 ते 25 वेळा लग्न करू शकते.

मध्यस्थांच्या माध्यमातून असे लग्न केले जातात. या लग्नाचा कालावधी कमीत कमी पाच दिवस आणि जास्तीत जास्त 20 दिवस असतो. ज्याला लग्न करायचं आहे, अशा तरुणांकडून विशिष्ट रक्कम घेतली जाते, त्यातून एक हिस्सा हा मध्यस्थाला देखील दिला जातो. त्यानंतर त्यांचं लग्न लावलं जातं. (world)हे लग्न 15 दिवसांच्या कालावधी साठी असते. 15 दिवसांनंतर हा करार आपोआप संपुष्टात येतो.

इंडोनेशियामध्ये ही प्रथा अजूनही सुरू आहे. इथे येणारे पर्यटक येथील तरुणींसोबत या पद्धतीचं लग्न करतात, या बदल्यात त्या तरुणींना पैसे मिळतात. ज्याचा उपयोग ते आपलं घर चालवण्यासाठी करतात. याबाबत बोलताना एका 28 वर्षीय महिलेनं माहिती दिली की, 15 दिवसांच्या करारावर लग्न केलं जातं. वर्षभरात एक तरुणी अशा पद्धतीने वीस ते बावीस लग्न देखील करू शकते. एका लग्नाचा मोबदला म्हणून 300 ते 500 डॉलर भेटतात ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 25 ते 43 हजार रुपये इतकी असते. त्यानंतर तुम्हाला लग्नाला परवानगी मिळते.

हेही वाचा :

असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral

रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा

सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल