महागड्या गाड्या चालवणारे बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांना कर्नाटक आरटीओने दंड ठोठावला आहे. या दोन्ही स्टार्सनी रोड टॅक्स भरलेला नाही, ज्यामुळे त्यांची नावे आरटीओच्या(RTO) दंड सूचनेत येत आहेत. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे आणि केजीएफ बाबू कोण आहे. हे आपण आता जाणून घेणार आहोत.
रोड टॅक्स न भरल्याबद्दल कर्नाटकच्या आरटीओमध्ये(RTO) दोन रोल्स रॉयस कारना लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दोन्ही गाड्या अमिताभ बच्चन आणि आमिर खान सारख्या स्टार्सच्या नावावर करण्यात आल्या आहेत. तथापि, सध्या यापैकी कोणत्याही गाड्या अमिताभ किंवा आमिर खानकडे नाहीत. उलट, बंगळुरूचे व्यापारी आणि राजकारणी युसूफ शरीफ उर्फ ‘केजीएफ बाबू’ हे या गाड्यांचे सध्याचे मालक आहेत.
केजीएफ बाबूवरही हा दंड ठोठावण्यात आला आहे. कर्नाटकात स्थानिक रोड टॅक्स न भरता लक्झरी कार चालवल्याबद्दल युसूफ शरीफ यांना आता एकूण ३८.२६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी एक रोल्स रॉयस फॅंटम आहे, जी एकेकाळी बिग बीची होती आणि दुसरी रोल्स रॉयस घोस्ट आहे, जी पूर्वी आमिर खानची होती. या दोन्ही गाड्या अजूनही महाराष्ट्रात दोन्ही सुपरस्टार्सच्या नावावर अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत. तसेच, आता त्यांच्यापैकी दोघांकडेही या गाड्या नाहीत.
परिवहन अधिकाऱ्यांनी माहिती दिली की २०२१ पासून बेंगळुरूच्या रस्त्यांवर फॅंटम आणि २०२३ पासून घोस्ट दिसले आहेत. कर्नाटक कायद्यानुसार, राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरल्या जाणाऱ्या वाहनांची स्थानिक पातळीवर पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार कर आकारणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही वाहनांनी तसे केले नाही आणि दोन्हीसाठीचा कालावधी देखील संपला आहे. त्यामुळे, आरटीओने (RTO)फॅंटमला १८.५३ लाख रुपये आणि घोस्टला १९.७३ लाख रुपये दंड ठोठावला आहे.
मजेची गोष्ट म्हणजे, दोन्ही वाहनांची मालकी बदलली आहे, परंतु कागदपत्रे बदललेली नाहीत. त्यामुळे, दोन्ही वाहने अजूनही बॉलीवूड स्टार्सच्या नावावर नोंदणीकृत आहेत. युसूफ शरीफ उर्फ ‘केजीएफ बाबू’ यांनी कधीही वाहने त्यांच्या नावावर हस्तांतरित केली नाहीत. आरटीओ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की दोन्ही वाहने सतत वापरली जात आहेत. परंतु कागदपत्रांच्या आधारे, दोन्ही वाहने अजूनही अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या नावावर आहेत.
हेही वाचा :