पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शनची शक्यता अधिक असते. (monsoon)हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. यामुळे पावसाळ्यात काय काळजी घ्यावी.
पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची (monsoon) शक्यता अधिक असते. हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. कानात जमा होणाऱ्या मळातील ओलावा हा जिवाणू किंवा बुरशी वाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण उत्तम ठरते. २७ ते ६६ वयोगटातील १० पैकी ४ प्रौढांमध्ये पावसाळ्यात ओटिटिस मीडिया आणि बाह्य कानाचे बुरशीजन्य संसर्ग वाढल्याचे आढळून आले. दमट हवामान, अस्वच्छता आणि दूषित पाण्याचा संपर्क यामुळे पावसाळ्यात संसर्गाच्या प्रमाणात वाढ होते. कानाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ईएनटी डॉ. सुश्रुत देशमुख म्हणाले की, पावसाळ्यात, वाढलेली आर्द्रता आणि ओलसरपणा ही जीवाणू आणि बुरशीजन्य वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते. पावसात भिजल्यानंतर किंवा पोहताना कानात पाणी शिरल्याने कानाचा संसर्ग होऊ शकतो, विशेषतः जर कान व्यवस्थित कोरडे केले नाही तर हा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ऍलर्जी, सर्दी आणि सायनस सारखे संसर्ग देखील वाढतात, ज्यामुळे कानात जळजळ होते. कमकुवत (monsoon) रोगप्रतिकारक शक्ती किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना या हंगामी संसर्गाचा धोका अधिक असतो. सामान्य कारणांमध्ये कानांच्या स्वच्छतेचा अभाव, अस्वच्छ पाण्यात पोहणे किंवा जास्त वेळ इअरफोनचा वापर करणे यांचा समावेश आहे. कान दुखणे, ऐकू न येणे, कानातून स्त्राव बाहेर पडणे आणि कधीकधी ताप अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये, चक्कर येणे किंवा कानात आवाज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. गेल्या महिन्यात, १० पैकी ४ प्रौढांमध्ये कानात दुखणे, खाज सुटणे आणि कानातून द्रव बाहेर येणे यासारखी लक्षणे दिसून आली.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, कानाचे संसर्ग टाळण्यासाठी, आंघोळ केल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ कोरडे ठेवा. कानात इअरबड्स, कापसाचे बोळे किंवा बोटं घालणे टाळा. घरातील आर्द्रता कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करा. कानाची साधी तपासणी केल्याने ओटिटिस मीडिया किंवा बुरशीजन्य संसर्गाचे वेळीच निदान होण्यास मदत होते. बहुतेक प्रकरणांमध्ये औषधांचे सेवन आणि कान स्वच्छ व कोरडे ठेवल्याने संसर्ग दूर करता येतो, परंतु जर याकडे दुर्लक्ष केले तर मात्र ऐकू न येण्याची समस्या उद्भवते. पावसाळ्यात कान कोरडे आणि स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे. कानात वेदना, खाज सुटणे किंवा कानातून स्त्राव होत असल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या. वैद्यकीय सल्ल्यानेच कानात ड्रॉप्सचा वापर करा.
हेही वाचा :