तयार राहा! यंदा सामान्यापेक्षा ‘इतके’ टक्के जास्त पाऊस कोसळणार

यंदाचा मान्सून मुंबईकरांसाठी दिलासा देणारा(monsoon) ठरणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, मुंबईत यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची ६५% शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई व उपनगरांतील नागरिकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे, विशेषतः पाणीकपात टाळण्यासाठी पावसाचे महत्त्व ओळखता येते. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांच्या मते, यंदा मुंबईसह महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून सक्रीय राहणार असून, काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी विशेष म्हणजे, तलावांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्यावर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. त्यामुळे भरघोस पावसामुळे पाणीकपात होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होईल.

सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस – मुंबईसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये होईल.सरासरीपेक्षा कमी पाऊस – जम्मू-काश्मीर(monsoon) , लडाख, तामिळनाडू, बिहार आणि ईशान्य भारतातील काही भागामध्ये होईल.मुंबईत मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट ओसरली आहे. मंगळवारी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअसवर होते, जे बुधवारी घटून ३४.८ अंश सेल्सिअस झाले.

मात्र, आर्द्रतेचं प्रमाण वाढल्याने हवामान काहीसं दमट (monsoon) राहणार आहे. रात्रीच्या तापमानात फारसा बदल झालेला नाही.प्रादेशिक हवामान विभाग लवकरच एक सविस्तर मान्सून पॅटर्न रिपोर्ट जाहीर करणार आहे. त्यानंतर पावसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा कालावधी, पावसाचा टक्का, वादळी वाऱ्यांची शक्यता आदी बाबी स्पष्ट होतील
हेही वाचा :
लग्न झालेल्या पुरुषांना का आवडतात दुसऱ्यांची बायको?
प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार देणार, देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा
आता शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य; अन् दांडी मारली तर…