अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी (politics)युवक काँग्रेसमधील तरुण पदाधिकाऱ्याने जीवन संपवल्याने सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. ओंकार हजारे असं या युवकाचं नाव असून, ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते. ‘अण्णा’ या टोपणनावाने परिचित असलेल्या ओंकार हजारे यांचं अकाली निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी सकाळी ओंकार कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर एका सुपरमार्केटजवळ उभ्या असलेल्या गाडीत ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ओंकार हजारे यांचं २०१९ मध्ये विवाह झालं होतं. त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. काही महिन्यांपासून ते मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे रविवारी त्यांच्या मेव्हण्याचं लग्न होतं, मात्र त्या लग्नाचं निमंत्रण ओंकार यांना न दिल्याचं समजते. यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
संघटनात्मक कामगिरीत अग्रेसर, ‘अण्णा’ म्हणून ओळख :
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या(politics) माध्यमातून ओंकार हजारे यांनी सोलापुरात संघटनात्मक पातळीवर चांगलं काम केलं होतं. युवकांमध्ये त्यांना ‘अण्णा’ या नावाने मोठी लोकप्रियता होती. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पक्षात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.
सदर घटनेने केवळ पक्षच नव्हे, तर सोलापूर जिल्ह्यातील युवकांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हेही वाचा :