आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य (former)संस्थांच्या निवडणुकांआधीच महाराष्ट्रात पक्षबदलाचे वारे वाहू लागले आहेत. कोकणात ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेने हादरे दिल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटातील खदखद आता समोर आली असून, मोठं खिंडार पडणार आहे. माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

धुळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणार आहे. माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधणार आहेत. शरद पाटील हे आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट प्रवेश करणार आहेत. ते ‘घड्याळ’ हातात बांधणार आहेत. ते मुंबईत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
यापूर्वी शरद पाटील यांनी शिवसेनेमधून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर मागील काही काळापासून पक्षातील कुरघोडींना कंटाळून काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला होता. (former)परंतु त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा शिवसेनेत ते परतले होते. परंतु, आता पुन्हा माजी आमदार शरद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज त्यांचा प्रवेश होणार आहे.
धुळ्यात ठाकरे गटात नाराजी कायम आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे पक्षाला मिळाली होती. या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. (former)मात्र, अनिल गोटेंना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं पक्षांतर्गत नाराजी होती. आता माजी आमदार शरद पाटील यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ही नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही: अजित पवारांनी हात झटकले
आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ
राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा