ढाका:बांग्लादेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांग्लादेशमध्ये एअरफोर्सचे F7 एअरक्राफ्ट(aircraft) हे ढाका येथील उत्तरी भागात असलेल्या एका शाळेच्या परिसरात कोसळले आहे. बांग्लादेशमध्ये वायुसेनेचे एफ-७ विमान आज दुपारी ढाका येथील उत्तर भागात कोसळले आहे. हे विमान शाळेच्या जवळील भागात कोसळले आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
शाळा सुरु असताना बांग्लादेश वायुसेनेचे हे ट्रेनर विमान कोसळले आहे. शाळेत विद्यार्थी उपस्थित असताना हे विमान कोसळले आहे. समोर आलेल्या व्हिडीओनुसार घटनास्थळावरून आगीचे लोळ स्पष्टपणे दिसून येत आहे. हे विमान वायुसेनेचे असल्याचे सैन्याने स्पष्ट केले आहे. चार व्यक्ती जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे.
एअर इंडियाच्या विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. उड्डाण होताच विमान कोसळले, ज्यामध्ये २६० लोकांचा मृत्यू झाला. एअरक्राफ्ट(aircraft) अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद पडले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन टेकऑफच्या काही सेकंदातच बंद पडले, अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली.
VIDEO | Dhaka: Bangladesh Air Force training jet crashes into a school in Dhaka, killing at least one person, fire official says. More details awaited.
(Source: PTI Videos) pic.twitter.com/bzXMGqJTEE
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2025
अहवालात नोंदवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की, टेकऑफच्या वेळी एका पायलटने एका सहकाऱ्याला विचारले, “तुम्ही इंधन का कमी केले?” उत्तरात, दुसऱ्या पायलटने म्हटले, “मी हे केले नाही. यावरून हे स्पष्ट होते की पायलटने इंधन बंद केले नव्हते. यामुळे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ एकाच वेळी कसे झाले असा प्रश्न उपस्थित होतो. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
08:08:42 UTC ला विमानाने १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला. फक्त एका सेकंदात, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ स्थितीत हलवले. वैमानिकांनी ताबडतोब दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला आणि रिलाईट प्रक्रिया देखील सुरू झाली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. परिणामी विमान 08:09:11 UTC वाजता क्रॅश झाले.
हेही वाचा :