राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. यातच महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे. नाशिकमध्ये तर भाजपने(politics) ठाकरे गटाला अक्षरशः सुरुंग लावला आहे. दिग्गज आणि जनाधार असणारे नेते एका मागोमाग एक महायुतीत प्रवेश करत आहेत.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भाजपात(politics) प्रवेश केला. त्यानंतर विलास शिंदे यांनी धनुष्यबाण हाती घेतला. आता उद्धव ठाकरेंना धक्का देणारी आणखी एक घडामोड नाशकात घडणार आहे. विलास शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आता तेच राजवाडे भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत.
हेही वाचा :