भाजप नेत्याची भरदुपारी धारधार कोयत्याने हत्या video viral

बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (knife)भाजप लोकसभा विस्तारकाची बीडमध्ये धारधार कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबासाहेब आगे असे भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. माजलगावच्या कीट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची धारधार कोयत्याने हत्या करण्यात आली.बीडमधील माजलगाव शहरात भरदिवसा भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली.

धारदार शस्त्राने वार केल्याने बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही माजलगावच्या कीट्टी आडगाव येथे घटना घडली. या घटनेमुळे (knife)परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे यांची हत्या नेमकी हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नही. पोलिसांकडून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील खुणाचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे हे भाजप (knife)लोकसभा विस्तारक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. आगे यांच्या हत्येची घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. याप्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्त्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. बीड पोलिसांकडून कसून तपास केला जातोय.

हेही वाचा :

मोठी बातमी! आघाडीतून मोठा पक्ष पडला बाहेर…

मृत्यू झुंज देणाऱ्या पत्नीला पतीने विचारली शेवटची इच्छा Ex सोबत शारीरिक संबंध

खरबूज टरबूज आणि डाळिंब गोड आहे की नाही कसे ओळखावेत जाणून घ्या

मोठी बातमी! आघाडीतून मोठा पक्ष पडला बाहेर…