बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं अन्…; पुढे जे घडलं पाहून बसेल धक्का, Video Viral

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही हॉस्टेलच्या(Hostel) मुलींचे-मुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी होस्टेलमध्ये लपून जेवण बनवणे, तर कधी होस्टेलमधून बाहेर पळून जाणे, तर कधी हॉस्टेलचे नियम मोडणे, असे अनेक किस्से, त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

अनेकदा मुले-मुली हॉस्टेलची(Hostel)बंधने तोडण्यासाठी हद्दच पार करतात. सध्या असाच एक धक्कादायक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने असे काही केले आहे की, संपूर्ण बॉइज हॉस्टेसमध्ये गोंधळ उडाला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलीवूड चित्रपटाच्या कहानीप्रमाणेच काहीसे घडले आहे. एका तरुणाने मुलीला सुटकेसमध्ये बंद करुन बॉइज हॉस्टेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचा हा स्टंट फसला असून हॉस्टेलच्या गार्डने त्याला पकडले आहे. ही घटना हरियाणाच्या सेनीपत येथील ओपी जिंदाल विद्यापीठात घडल्याचे व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये सांगण्यात आले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बॉइज हॉस्टेलच्या(Hostel) गार्ड एक सुटकेस खोलण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, सुटकेसमध्ये एक मुलीला बंद केल्याचे दिसत आहे. तसेच काही महिला गार्डही दिसत आहे. सुटकेस खोलण्याचा प्रयत्न सुरु असून हॉस्टेलच्याच एका विद्यार्थ्याने ही घटना कॅमेरात कैद केली आहे.

दरम्यान सुटकेसमध्ये मुलगी असल्याचे गार्ड आणि प्रशासनाला कसे कळाले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परंतु सोशल मीडिया युजर्सने दावा केला आहे की, बॉयफ्रेंडने मुलीला हॉस्टेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheSquind शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘एका मुलाने त्याच्या प्रेयसीला सुटकेसमध्ये घालून मुलांच्या वसतिगृहात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पकडला गेला. ठिकाण: ओपी जिंदाल विद्यापीठ’ असे म्हटले आहे.

अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मुलगी पण तेवढीच जबाबदार आहे, जेवढा मुलगा असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने एवढं डोकं चालतं तरी कसं असे म्हटले आहे. आणखी एकाने त्यांची बिचाऱ्यांची काय चूक, ते प्रेमात आहेत, भेटायचे असेल त्यांना असे म्हटले आहे. तर अनेकांनी याला विरोध केला असून हे चूकीचे आहे असे म्हटले आहे.

हेही वाचा :

बाबा वेंगा यांची फोनबाबत हादरवून टाकणारी भविष्यवाणी

GT ला मोठा झटका मॅचच्या काही तास आधी स्टार खेळाडूने सोडली टीमची साथ

‘निळा ड्रम, महिलेचे 15 तुकडे अन् लहान मुलीचा ‘तो’ फोन…’, सत्य समोर येताच पोलिसही हादरले