भारत विरुद्ध इंग्लंडयांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा (series )सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवला जातोय. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला. त्यांचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या पायाला बॉल लागल्याने तो दुखापतग्रस्त झाला. वेदनेनं कळवळत त्याला ऍम्ब्युलन्सने मैदानाबाहेर नेण्यात आलं. दुखापतीमुळे पंतला रिटायर्ड हर्ट म्हणून बाहेर पाठवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मैदानात येणार की नाही याबाबत शंका असताना शार्दूल ठाकूरची विकेट पडल्यावर पंत मैदानात फलंदाजीसाठी आला. त्याला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवून त्याचं स्वागत केलं. एवढंच नाही तर दुखापतग्रस्त असलेल्या ऋषभ पंतने भारतासाठी 54 धावांची कामगिरी केली. पंतची ही कामगिरी पाहून सर्वच भारावले. सचिन तेंडुलकरआणि संजीव गोयंका (यांनी त्याच कौतुक केलं.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर?
जखमी असलेला ऋषभ पंत शार्दूलची विकेट गेल्यावर मैदानात आला. यावेळी त्याने संघ संकटात असताना अर्धशतक पूर्ण केलं. यावर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने पंतचं कौतुक करत म्हटलं, ‘ऋषभने अद्भुत व्यक्तिमत्व दाखवले. दुखापतग्रस्त असूनही, त्याने पुनरागमन केले आणि दमदार कामगिरी (series ) केली. त्याच्या अर्धशतकावरून देशासाठी खेळण्यासाठी किती संयम आणि दृढनिश्चय आवश्यक आहे हे दिसून येते. ऋषभची ही खेळी दीर्घकाळ लक्षात राहील. त्याने खूप चांगली फलंदाजी केली’.
संजीव गोयंका काय म्हणाले?
संजीव गोयंका हे एक उद्योगपती असून आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक सुद्धा आहेत. संजीव गोयंका यांनी आयपीएल २०२५ साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये पंतवर २७ कोटींची विक्रमी बोली लावली होती. संजीव गोयंका ऋषभ पंतने दुखापतग्रस्त असताना इंग्लंड विरुद्ध खेळी पाहून (series ) खूपच भारावले. त्यांनी पोस्ट करून लिहिले की, ‘फक्त प्रतिभा नाही. हे चारित्र्य आहे. सॅल्यूट’.
पंतची दुखापत किती गंभीर?
टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या उजव्या पायावर बॉल लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मीडिया रिपोर्ट्समधून गुरुवारी सकाळ पासून पंतच्या दुखापतीबाबत अनेक अपडेट्स समोर येत होत्या. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून तो ही सीरिज पुढे खेळू शकणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभला डॉक्टरांनी जवळपास दीड महिना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चौथ्या टस्टमध्ये टीम इंडियाला दहा फलंदाजांसह खेळावं लागेल अशी शक्यता होती. मात्र या सर्व शक्यतांवर पंतने पाणी सोडलं आणि शार्दूलची विकेट पडल्यावर टीम इंडिया संकटात असताना तो मैदानात आला.
प्रेक्षकांनी जल्लोषात केलं स्वागत :
102 व्या ओव्हरला शार्दुल ठाकुरची विकेट पडल्यानंतर आता टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी कोण येणार याची प्रतीक्षा असताना ऋषभ पंत हळूहळू पायऱ्या उतरत मैदानात आला. त्याला पाहून प्रेक्षकांनी गर्दीने एकच जल्लोष केला. लंगडतच त्याने फलंदाजीला सुरुवात केली. फ्रॅक्चर झालेल्या पायासोबतही त्याला त्याच्या संघासाठी लढायचे आहे, त्यामुळे त्याच्या कृतीचं क्रीडाविश्वात कौतुक होत आहे. बीसीसीआयने अपडेट देत सांगितलं की, ‘मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी उजव्या पायाला दुखापत झालेला ऋषभ पंत उर्वरित सामन्यात विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार नाही. ध्रुव जुरेल यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडेल. दुखापत असूनही, ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी संघात सामील झाला आहे आणि संघाच्या गरजेनुसार फलंदाजीसाठी उपलब्ध असेल.
हेही वाचा :