रील्स (reel )बनवणं आणि सोशल मीडियावर आपली कला दाखवणं हे आजच्या तरुण पिढीचं आकर्षण आहे. अशाच क्रिएटिव्ह लोकांसाठी केंद्र सरकारने एक सर्जनशील आणि कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘A Decade of Digital India – Reel Contest’ या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली असून, यामध्ये सहभागी होणाऱ्यांना ₹१५,००० पर्यंत रोख बक्षीस मिळू शकते.
ही स्पर्धा डिजिटल इंडिया मिशनच्या १० वर्षांच्या यशस्वी पूर्णतेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे. डिजिटल सेवांमुळे आपल्या जीवनात काय बदल झाले आहेत, यावर आधारित रील्स(reel ) तयार करून ही स्पर्धा जिंकता येईल. यासाठी 1 ऑगस्ट 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याची सोपी प्रक्रिया :
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तुम्हाला https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest या MyGov च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे लॉग-इन केल्यानंतर तुमचं रील सबमिट करता येईल. लॉग-इनसाठी ईमेल, मोबाईल नंबर किंवा सोशल मीडिया अकाउंटचा वापर करता येतो.
रील्स सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल किंवा मेसेजद्वारे त्याची पोचपावती मिळेल. तुमचं रील्स जितकं सर्जनशील असेल, तितकं स्पर्धा जिंकण्याचं शक्यता जास्त असते.
बक्षिसांची रचना कशी आहे? :
या स्पर्धेत एकूण ८५ विजेते निवडले जाणार आहेत आणि एकूण ₹२ लाखांचं रोख बक्षीस वितरित केलं जाणार आहे. बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:
टॉप 10 रील्स – प्रत्येकी ₹15,000
पुढील 25 विजेते – प्रत्येकी ₹10,000
पुढील 50 विजेते – प्रत्येकी ₹5,000
या स्पर्धेद्वारे सरकार तरुणांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे डिजिटल इंडियाच्या यशोगाथा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतील.
हेही वाचा :